Goa News : एकत्र कुटुंब पद्धत आनंदी जीवनाचा मंत्र : डॉ. राजेंद्र बर्वे

Together Family Method : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबाची साथ सोडू नका
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, आज प्रत्येकजण तणावग्रस्त जीवन जगत आहे. मानसिक तणावाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे, नाहीतर त्यातून गंभीर परिणाम निर्माण होऊ शकतात. तणावग्रस्त अवस्थेतून जाताना कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असते.

त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत ही आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचा मंत्र आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचार तज्ज्ञ तथा लेखक, विचारवंत डॉ. राजेंद्र बर्वे यांनी येथे केले.

अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानतर्फे परिवारातील बुद्धिमान विद्यार्थिनी अनघा हिच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त नवे विचार, नव्या प्रेरणा जागविण्यासाठी

‘मानसिक तणाव आणि कुटुंब’ या विषयावर डॉ. राजेंद्र बर्वे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Goa
Actor C V Dev Death: दाक्षिणात्य अभिनेते CV देव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहली श्रद्धांजली

याप्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रेया वाचासुदंर, संस्थापक सदस्य आनंद वाचासुंदर, विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर दिलीप बेतकीकर

उपस्थित होते.

डॉ. बर्वे म्हणाले की, आज बदलत्या काळात कुटुंबाची व्याख्या बदलत चालली आहे. कुटुंबात आपण कसे जगतो, आपली नेमकी भूमिका काय यावर लक्ष केंद्रित करणे आज महत्त्वाचे आहे. नाती जोडणे, जपणे आणि स्वच्छ मनाने ती नाती निभावणे हीच गोष्ट आज कठीण होऊन बसली आहे. आज जो तो एकमेकांना दोष देण्यात व्यस्त आहे. ज्याला आवर घालणे काळाची गरज आहे.

‘सेकंड इनिंग’चे प्रकाशन

यावेळी डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे संस्थापक आनंद वाचासुंदर यांनी, सद्यस्थितीत वृद्धांची स्थिती, त्यांच्या गरजा, अपेक्षा आणि समस्या याविषयी लिहिलेल्या ‘सेकंड इनिंग - आयुष्यातील दुसरा टप्पा’ या वैचारिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या निबंध लेखन, कथा कथन, नाट्यछटा, रस्ता नाट्य आदी विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

Goa
Diwali in J&K: जम्मू-काश्मीरच्या 'या' मंदिरात 75 वर्षांनंतर साजरी झाली दिवाळी, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाहिलं असं दृश्य

दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची ताकद ज्याने आत्मसात केली, तीच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते. याचबरोबर शांत राहण्याची कला प्रत्येकाने शिकली पाहिजे. कारण मानसिक तणाव कमी करण्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा शांत राहण्यातच असतो.

ज्याच्या माध्यमातून माणसाच्या संवेदना कमी होतात त्याचप्रमाणे भावना नियंत्रणात राहतात. सुरवातीपासून पालक आणि मुलांची भूमिका सारखीच असते. लहानपणी पालक मुलांचा सांभाळ करतात, तर वृद्धावस्थेत मुले पालकांचा सांभाळ करतात. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबाची साथ कधीच सोडू नये.

- डॉ. राजेंद्र बर्वे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com