Mopa Airport : ‘मोपा’साठी जमीन दिलेल्यांना ‘लॅंड लुझर’चे प्रमाणपत्र द्यावे

Mopa Airport : ‘शिव वॉरीयर्स’चे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport :

पेडणे ,मोपा विमानतळासाठी जमीन दिलेल्यांना ‘लॅंड लुझर’ प्रमाणपत्र द्यावे, जीएमआर कंपनीने २२० नोकऱ्या द्याव्यात, या आणि इतर मागण्यांचे निवेदन शिव वॉरीयर्स युनायटेड टॅक्सी ब्रदर्स असोसिएशनतर्फे पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांची भेट घेऊन देण्यात आले.

आनंद गावस, निखिल महाले, रामा वारंग यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी चांदेल हसापुरचे सरपंच तुळशीदास गावस उपस्थित होते. उप जिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी याबाबत स्थानिक सरपंच ,पंच ,लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने या समस्या सोडवा, असे सांगितले.

जीएमआर कंपनीने विमानतळावर २२० नोकऱ्या द्याव्यात किंवा ब्लू कॅब टॅक्सीसाठी परवाना द्यावा. मोपा विमानतळावर जीएमआर कंपनीने फक्त पेडणेतालुक्यातीलच टॅक्सी चालवाव्यात. राज्याबाहेरील सद्या बेकायदेशीरपणे विमानतळावर व्यवसा करणाऱ्या टॅक्सी बंद कराव्यात.

Mopa Airport
Goa's Top News: दूधसागर, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक, अपघात; राज्यातील ठळक बातम्या

खासगी गाड्या थेट ग्राहकांना दिल्या जातात,हे १९८८ च्या मोटार वाहन कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन ठरते. ‘रेंट अ कॅब’ सारखे प्रकार मोपा विमानतळावर बंद व्हावेत. गोवा माईल्स पासिंगचा कोणताही विचार न करता पेडणेतील टॅक्सी चालकांना डावलून बाहेरच्या टॅक्सीना अर्ध्या दराने सर्व ट्रिप विकत आहे. गोवा माईल्स ही ओला,उबेर सारखी ॲप कंपनी आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे ऑपरेशन फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चालवावे,अशी मागणी केली.

Mopa Airport
Goa Statehood Day: प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि CM सावंत यांनी दिल्या घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा

टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्यांबाबत आमदार प्रवीण आर्लेकर यांची भेट घेऊन या समस्या मांडू. त्यांच्याशी चर्चेनंतर आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

- तुळशीदास गावस, चांदेल - हसापुरचे सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com