Academic Year 2024 : शैक्षणिक वर्ष यंदा दोन दिवस उशिराने सुरू करावे : सभापती तवडकर

Academic Year 2024 : काही शिक्षक मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आल्याने शैक्षणिक वर्ष दोन दिवस उशिरा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सभापती रमेश तवडकर यांनी विनंती केली आहे.
Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Academic Year 2024 :

पणजी, येत्या मंगळवारी ४ जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्याच दिवशी लोकसभा निवडणूक मतमोजणी होणार आहे.

काही शिक्षक मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आल्याने शैक्षणिक वर्ष दोन दिवस उशिरा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सभापती रमेश तवडकर यांनी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळासह पालकांचे लक्ष आहे.

काही दिवसांपूर्वी विरोधकांनी हीच विनंती केली होती, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ती फेटाळून लावत ठरल्यानुसारच शाळा सुरू होतील, अशी स्पष्टोक्ती केली होती. त्यामुळे तवडकर यांनी केलेल्या विनंतीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा मतमोजणीच्या दिवशीच राज्यातील शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी पालक आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यास जातात. ज्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती केली आहे त्यांना मुलांना शाळेत घेऊन जाण्यास अडचणी येणार आहेत. शाळेत सर्व शिक्षक उपस्थित असणार नाहीत. त्यामुळे मुलांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येतील, अशा आशयाचे मला

अनेकांकडून फोन आल्याने ही विनंती मुख्यमंत्र्यांना फोन करून केल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले. हा विषय तांत्रिक स्वरूपाचा असल्याने त्यावर विचार करतो, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. पुन्हा त्यांना व्यक्तिशः भेटून यासंदर्भात चर्चा करणार आहे, असेही ते म्हणाले.

Ramesh Tawadkar
Goa Fraud Case: बंगल्यासाठी जमीन देण्याचा वादा; मुंबईच्या अ‍ॅड फिल्म डिरेक्टरला गोव्यातील दाम्पत्याचा दीड कोटींचा चुना

मतमोजणीमुळे गोंधळ उडण्याची शक्यता !

मतमोजणी असल्याने त्या दिवशी निवडणुकीचे वातावरण असणार आहे. शाळा त्याच दिवशी सुरू केल्यास काहीसा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्यात मडगाव येथील दामोदर महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे या त्याभागातील आजूबाजूच्या शाळांना दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मात्र उत्तर गोव्यात आल्तिनो - पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी जवळपास कोणत्याच शाळा नसल्याने सुट्टी जाहीर केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com