Smart City Panaji: राजधानीत टॅक्सी पार्किंग बंदीचा पुनर्विचार होणार? संघटनेच्या प्रशासनाकडे 'तीन' महत्त्वाच्या मागण्या

Panaji Traffic Issue: स्मार्ट पणजीत टॅक्सी पार्किंग बंदीचा पुनर्विचार करण्यात यावा आणि टॅक्सींसाठी ठरावीक पार्किंग झोन उपलब्ध करून द्यावेत, अशी ऑल गोवा टॅक्सी ड्रायव्हर्स असोसिएशननं मागणी केलीय.
Panaji Traffic Issue
Panaji Traffic IssueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्मार्ट पणजीत लागू करण्यात आलेल्या टॅक्सी पार्किंग बंदीचा पुनर्विचार करण्यात यावा आणि टॅक्सींसाठी ठरावीक पार्किंग झोन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ऑल गोवा टॅक्सी ड्रायव्हर्स असोसिएशनने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन यासंदर्भात एक निवेदन सादर केले. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना आमच्या समस्या सांगितल्या अशी माहिती अध्यक्ष शेख मुझफ्फर अहमद यांनी दिली.

ते म्हणाले, टॅक्सी सेवा ही गोव्याच्या पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, या नवीन निर्बंधामुळे टॅक्सीचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारकडून वार्षिक रोड टॅक्स आणि इतर अनेक शुल्क भरूनही चालकांना योग्य सोयी मिळत नाहीत.

Panaji Traffic Issue
Goa Corruption Case: "मडकईकरांना चौकशीसाठी बोलावून शहानिशा करा", तक्रारदारांची ACBकडे मागणी

टॅक्सीचालक संघटनेने प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये टॅक्सी पार्किंग बंदीचा पुनर्विचार करून पणजीमध्ये टॅक्सीं पार्किंगसाठी ठरावीक जागा उपलब्ध करून द्याव्यात, जर पार्किंग बंदी कायम ठेवायची असेल, तर पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात यावी आणि अशा महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी टॅक्सी चालक संघटनांशी चर्चा करून सर्वांसाठी न्याय्य आणि व्यवहार्य तोडगा काढावा, या मांडण्या आहेत.

हा निर्णय फेब्रुवारी २८ रोजी नोटिस काढून जाहीर केला. त्यानंतर काही टॅक्सीचालकांनी आपल्या टॅक्सी पार्क करून त्यांना पैसे देखील दिले, परंतु तरीही केवळ या नोटिशीमुळे चालकांना २.५ हजार रुपयांचा दंड आरटीओने दिला. आम्ही पार्किंग शुल्क द्यायला तयार आहोत, हे देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

Panaji Traffic Issue
Goa Corruption Case: "मडकईकरांना चौकशीसाठी बोलावून शहानिशा करा", तक्रारदारांची ACBकडे मागणी

सकारात्मक प्रतिसाद

या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संघटनेला आश्वासन दिले, की या प्रकरणाचा लवकरच आढावा घेतला जाईल आणि योग्य ती कार्यवाही केली जाईल. संघटनेचे अध्यक्ष शेख मुझफ्फर अहमद यांनी सांगितले की, ही समस्या अनेक टॅक्सीचालकांच्या उपजीविकेवर परिणाम करत आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून आम्हांला न्याय द्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com