Panaji News : स्मार्ट रस्ता’ होताच पुन्हा खोदकाम! जलवाहिन्यांना गळतीचा परिणाम

Panaji News : छायाचित्रे समाजमाध्यमांतून व्हायरल; प्रश्‍न उपस्थित
Panaji
Panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजीत आल्तिनोचा भाग सोडला तर सर्वत्र कोठेना कोठे खोदकाम सुरू आहे. अगदी रायबंदरपासून टोंकपर्यंत खोदकाम चालू आहे.

त्याशिवाय मध्य पणजीत जुंता हाऊसजवळ रस्त्याचे काम झाले असून पेव्हर्सही बसविले, तोच नळजोडणीसाठी खोदकाम केले आहे.

ही दोन्ही कामे पाहिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराची आठवण येते. कारण यापूर्वी रस्ता हॉटमिक्स झाल्यानंतर काही दिवसांनी रस्त्याच्या बाजूने वाहिनी टाकण्यासाठी चर खोदकाम सुरू व्हायचे.

Panaji
Goa News : विदेशातील काजूवर आयात शुल्क वाढवा! बागायतदारांची मागणी

स्मार्ट रस्त्याचे काम झाल्यानंतर खोदकाम करावे लागणार नाही, असे म्हटले असले तरी जुंता हाउसजवळ रस्त्याच्या बाजूचे पेव्हर्स बसविल्यानंतरही खोदकाम करण्यात आले आहे. यावरून चूक नेमकी कोणाची, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे रायबंदर परिसरात अंतर्गत रस्त्यांचे व गटाराचे काम, डांबरीकरणही झाले तोच जलवाहिनीची गळती काढण्यासाठी खोदकाम केले आहे. यावरून येथील कामाविषयी प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या खोदकामाची छायाचित्रे समाजमाध्यमांतून व्हायरल झाली आहेत व त्या कामांविषयी आता नेटकरी प्रश्‍न उपस्थित करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com