4G Services in Goa: राज्यातील 13 टक्के ग्रामीण भाग 4G सेवेपासून वंचित

ट्रेड ब्रेन्स’ने यासंदर्भात एक सर्व्हे केला असून त्यात गोवा 14 व्या स्थानावर असल्याचे नमूद केलेले आहे.
 4G Services in Goa
4G Services in GoaGomantak Digital Team
Published on
Updated on

4G Services in Goa: गोव्यातील 13 टक्के ग्रामीण भाग हा अजूनही 4G सेवेपासून वंचित आहे. ‘ट्रेड ब्रेन्स’ने यासंदर्भात एक सर्व्हे केला असून त्यात गोवा 14 व्या स्थानावर असल्याचे नमूद केलेले आहे. अहवालानुसार, देशातील 45,180 गावांत अजूनही 4G ’चे कनेक्शन पोहोचलेले नाही.

(13 Percent Rural Areas of Goa State Are Deprived of 4G Service)

त्यामुळे तेथील ग्रामस्थांना अत्याधुनिक अशा इंटरनेट सुविधेचा लाभ मिळत नाही. दिल्लीमधील सर्व गावांमध्ये ही सेवा उपलब्ध असून हे राज्य यासंबंधी पहिल्या क्रमांकावर आहे.

उत्तर प्रदेश दुसऱ्या तर बिहार हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये 0.4 टक्के गावांत तर बिहारमध्ये एक टक्के गावात 4G ची सेवा पोहोचलेली नाही.

या राज्यांच्या तुलनेत गोव्याची लोकसंख्या कमी आहे, असे असताना 13 टक्के गावे ही 4G इंटरनेट सुविधेपासून वंचित आहेत.

त्यामुळे कोरोनाच्या काळात दुर्गम भागातील गावांतील विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com