Panjim Roads: गणेश चतुर्थी काळात पणजीतील रस्ते चकाचक होणार! युद्धपातळीवर डागडुजीचे काम सुरु

Panjim Smart City: ८ भागांतील रस्त्यांची स्मार्ट सिटी योजनेखाली १५ दिवसांत डागडुजी पूर्ण केली जाणार आहे
Panjim Smart City: ८ भागांतील रस्त्यांची स्मार्ट सिटी योजनेखाली १५ दिवसांत डागडुजी पूर्ण केली जाणार आहे
Road RepairDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Road Repair

पणजी: राजधानी पणजीतील ११ भागांतील रस्त्यांची तातडीने डागडुजी सुरू आहे. त्यापैकी ८ भागांतील रस्त्यांची स्मार्ट सिटी योजनेखाली १५ दिवसांत डागडुजी पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी काळात पणजीतील रस्ते दुरुस्त झालेले असतील.

उर्वरित तीन भागांतील रस्ते पणजी महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याने त्यांची डागडुजी कधीपर्यंत पूर्ण केली जाईल, याची माहिती येत्या शुक्रवारपर्यंत देण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पणजी महापालिकेला दिली. पणजीतील महत्त्वाच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत.

सालसेत फार्मसी चौक ते हिंदू फार्मसीपर्यंतचा भाग आणि हॉटेल मानविनला जोडणारा रस्ता यावर सिमेंट काँक्रिटसह ‘रबल सोलींग’ करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त आझाद मैदान चौकापासून सालसेत फार्मसी चौकापर्यंत, डीआरएस व कॅफे भोसले, मार्केट जंक्शनपासून ते गीता बेकरी ते आझाद मैदानपर्यंत अशाच प्रकारचे काम केले जाणार आहे.

Panjim Smart City: ८ भागांतील रस्त्यांची स्मार्ट सिटी योजनेखाली १५ दिवसांत डागडुजी पूर्ण केली जाणार आहे
Panjim Smart City: सांतिनेज ताडमाड ते ‘एसटीपी’पर्यंतच्या रस्त्याचे काम पंधरा दिवसांत करणार

आत्माराम बोरकर रस्ता ते कदंब इमारत ते तांबा इमारत, ईडीसी येथील रस्तेही दुरुस्त करण्यात येणार आहेत. सांतिनेझ जंक्शन ते काकुलो मॉलपर्यंतचा ५० मीटर अंतराचा रस्ता, सांतिनेझ ते मधुबन, भाटले ते पणजी कन्व्हेंन्शन सेंटर ते जुना पाटो पूल, रुअ द ओरेम याच्याव्यतिरिक्त मळा भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. ही कामे येत्या पंधरा दिवसांत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

Panjim Smart City: ८ भागांतील रस्त्यांची स्मार्ट सिटी योजनेखाली १५ दिवसांत डागडुजी पूर्ण केली जाणार आहे
Panjim Road Issue : पणजी-मडगाव महामार्गाला भेगा ; अपघाताची शक्‍यता नागरिक त्रस्त

या रस्त्यांची दुरुस्ती महापालिका करणार

पणजीतील काही रस्ते स्मार्ट सिटीअंतर्गत कामामध्ये येत नाहीत. त्या रस्त्यांची डागडुजी पणजी महापालिकेला करावी लागणार आहे. त्यामध्ये आल्तिनो येथील इंडिया रेडिओ ते जॉगर्स पार्क, दूरदर्शन रस्ता, सांतिनेझ जंक्शन ते कांपाल ट्रेड सेंटरपर्यंतचा रस्ता यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com