Panaji police station attack Case Adjournment of Hearing : पणजी पोलिस स्थानकावर केलेल्या हल्लाप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत नवीन अपडेट समोर आली आहे. साक्षीदार अनुपस्थित राहिल्याने खटल्याची सुनावणी 11 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.
फेब्रुवारी 2008 मध्ये ताळगावचे तत्कालीन आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या काही कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी अटक केल्यानंतर विरोधी गटातील संशयितांनाही अटक करा, अशी मागणी घेऊन हा जमाव पोलिस स्थानकावर आला होता. या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.
या प्रकरणात तपास करण्यास सीबीआयने बाबूश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्यासह एकूण 37 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत या खटल्यातील एक पोलिस साक्षीदार न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे ही सुनावणी 11 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.