पणजी येथे सुमारे 10 लाख रुपये किंमतीची BSNL कंपनीची केबल चोरीला गेली आहे. अज्ञाताने केबल घेऊन जाता येऊ शकते याची चाचपणी करत केबल लांबवली आहे. याबाबत पणजी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
(Panaji police register FIR against unknown accused for committing theft of BSNL cable)
मिळालेल्या माहितीनुसार सध्या पणजी शहरातील फायर स्टेशन कंपाउंड वॉल पहिल्या गेटपासून ते काकुलो मॉल समोरील दुसऱ्या गेटपर्यंत BSNL कंपनीचे केबल टाकणे सुरु असून यासाठी कंपनीने यासाठी ठेकेदाराकरवी याबाबतची दुरुस्थी सुरु केली आहे. याचाच फायदा घेत अज्ञाताने सुमारे 9,98,520 रुपये किंमतीची केबल रात्रीच्यावेळी लांबवली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अज्ञाताविरोधात पणजी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून याबाबत चौकशी सुरु आहे. तसेच चोरट्यांचा मागोवा लवकरच लागेल असे ही पोलिसांनी सांगितले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चोरी झालेल्या रस्त्यावरुन ये - जा करणाऱ्या एखाद्याने याबाबत पाळत ठेवत BSNL केबल लाबंवली असावी असा अंदाज लावला जात आहे. मात्र गुन्ह्याची उकल झाल्याखेरीज अधिक स्पष्टता येणार नाही. असे पोलीसांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.