Panaji: गोव्याच्या राजधानीच्या महानगरपालिकेची इमारतच असुरक्षित! भिंत धोकादायक, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

Panaji Municipal Building: महानगरपालिकेची इमारतही असुरक्षित आहे. या इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी जीव मुठीत घेऊनच काम करताना दिसतात. ही इमारत म्हणजे धोक्याची घंटा आहे.
Panaji Municipal Building
Panaji Municipal Building Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महानगरपालिकेची इमारतही असुरक्षित आहे. या इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी जीव मुठीत घेऊनच काम करताना दिसतात. ही इमारत म्हणजे धोक्याची घंटा आहे. इतर इमारती धोकादायक म्हणून घोषित करणाऱ्या महानगरपालिकेला आपली स्वतःची नूतन इमारत उभारता येत नाही, त्याशिवाय इतर ठिकाणी स्थलांतरही करता येत नसल्याचे दिसते.

महानगरपालिकेची पोर्तुगीजकालीन इमारत आहे. त्या इमारतीची कालमर्यादाही ओलांडली आहे. सध्या इमारतीच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत, पहिल्या मजल्यावरील कार्यालयात अभियंते बसतात, त्या ठिकाणची पश्चिमेकडील भिंत असुरक्षित आहे.

Panaji Municipal Building
Panaji: धक्कादायक! स्मार्ट सिटी योजनेत 'पणजी'चा अनुल्लेख; केंद्राच्या महत्त्वपूर्ण दस्तऐवजात राजधानीचे नाव नाही

त्याशिवाय भिंतीला पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत. येथे बसणारे कर्मचारी जीव मुठीत घेऊनच काम करतात. इमारत जीर्ण झाली म्हणून नव्या इमारतीचे काम हाती घेतले. त्यासाठी या इमारतीभोवती असणाऱ्या इतर इमारतींचा भाग मोडून नव्या इमारतींसाठी जागा तयार केली. नव्या इमारतीसाठी तीनवेळा भूमिपूजन करण्यात आले.

Panaji Municipal Building
Panaji: धक्कादायक! स्मार्ट सिटी योजनेत 'पणजी'चा अनुल्लेख; केंद्राच्या महत्त्वपूर्ण दस्तऐवजात राजधानीचे नाव नाही

...स्लॅबचे तुकडे!

महानगरपालिकेच्या ज्या सभागृहात बैठका होतात, त्या सभागृहातील स्लॅबकडे पाहिल्यानंतरही भीती वाटते, अशी स्थिती आहे. यापूर्वी स्लॅबचे प्लास्टरही निखळून पडले आहे. राजधानी असलेल्या ठिकाणची महानगरपालिकेची इमारत ही अशी कशी असा प्रश्न पर्यटकांनाही पडत असेल. विशेष बाब म्हणजे नव्या इमारतीच्या आणि नव्या जागेत स्थलांतराचा विषयही बैठकीत कोणताही नगरसेवक उपस्थित करीत नाही, हेही विशेष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com