Gift For Success: माणुसकीच्या भावनेतून फुटला दातृत्वाला पाझर; गोव्यातील होतकरू विद्यार्थिनीला मोबाईल गिफ्‍ट

Gift For Success: माणुसकी अद्यापही जिवंत आहे, याची प्रचिती देणारा हा प्रसंग आज गुरुवारी (ता. १६) पणजीतील एका मोबाईल विक्रीच्या दुकानात घडला.
Panaji
Panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, विषय केवळ मोबाईल विकत घेऊन गिफ्‍ट देण्याचा होता. मात्र, मोबाईल विकत घेण्यामागची भावना समजल्यावर मोबाईल विक्रेता आपले तीन हजार रुपये त्यासाठी देण्यापासून स्वतःला परावृत्त करू शकला नाही.

त्यामुळे हा विषय मोठा बनला. माणुसकी अद्यापही जिवंत आहे, याची प्रचिती देणारा हा प्रसंग आज गुरुवारी (ता. १६) पणजीतील एका मोबाईल विक्रीच्या दुकानात घडला.

सामाजिक कार्यकर्ते दीपक मणेरीकर यांनी सांगितलेला हा किस्सा. यावर्षी एका गरीब घरातील कष्टाळू आईबापाची एक लेक दहावीच्या परीक्षेला बसली होती. ही मुलगी म्हणजे, त्या घरातून दहावी इयत्तेपर्यंत शिक्षण घेणारी पहिलीच व्यक्ती आहे. ही गोष्ट जेव्हा सुप्रसिद्ध प्रवचनकार प्रा. रमेश सप्रे सरांना समजली, तेव्हा त्यांनी ‘७५ टक्के गुण मिळविलेस तर तुला मी एक मोबाईल गिफ्‍ट देईन’ असे त्या मुलीला वचन दिले होते.

त्यानंतर परीक्षा झाली आणि बुधवारी दहावी परीक्षेचा निकालही लागला. त्या मुलीने चक्क ७९ टक्के गुण मिळवले आणि दिलेल्या वचनाला जागण्यासाठी प्रा. सप्रे सर मोबाईल विकत घेण्यासाठी पणजीतील ‘मोबाईल कॅफे’ या त्यांच्या नेहमीच्या दुकानात गेले. त्यांच्यासोबत मुष्टिफंड हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका पौर्णिमा सुखठणकर (आरती टीचर) आणि मणेरीकर हेही होते.

Panaji
Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

दुकानाचे मालक श्रीपाद हाटले यांनी त्या मुलीला चांगल्यापैकी उपयोगी पडेल असा एक मोबाईल सुचवला आणि तोच मोबाईल घ्यायचे सरांनी नक्की केले. सरांसाठी म्हणून १३ हजारांच्या सवलतीच्या किमतीला तो मोबाईल द्यायला हाटले तयार झाले.

आपण त्‍यातील ५० टक्के रक्कम देणारच असा हट्ट आरती टीचर यांनी धरला व शेवटी सप्रे सरांनी तो मान्य केला. तेवढ्यात, दुकानाचे मालक श्रीपाद हाटे यांनी त्या दोघांकडून प्रत्येकी फक्त ५ हजार रुपये घेतले व वरचे ३ हजार रुपये आपण स्वतः भरत असल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com