Goa Smart City: पणजी होणार 'स्मार्ट आणि सुरक्षित'; उर्वरित भागातही बसवले जाणार सीसीटीव्ही

Panaji Tourist Safety: किनारी भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारल्याने आणि देखरेख वाढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होईल.
Panaji Tourist Safety
Goa Smart CityDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पणजी शहरातील पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी मिरामार किनारपट्टी व पणजी प्रोमेनेड परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रोहित मोन्सेरात, पणजी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर तसेच स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.

महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले, किनारी भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारल्याने आणि देखरेख वाढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होईल. तसेच स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित व निर्भय वातावरण निर्माण होईल.

Panaji Tourist Safety
Goa Tourism: गोवा हाऊसफुल्ल! 2025 मध्ये 1 कोटी पर्यटकांची ऐतिहासिक नोंद, पण परदेशी पर्यटकांची पाठ; काय आहेत कारणे?

मिरामार किनारा आणि पणजी प्रोमेनेड हा परिसर पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या पसंतीचे फिरण्याचे ठिकाण असून येथे दिवस-रात्र मोठी वर्दळ असते. त्यामुळे या भागावर चोवीस तास प्रभावी नजर ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास योग्य आणि मोक्याच्या जागांची निश्चिती करण्यासाठी ही संयुक्त पाहणी करण्यात आली.

अधिकारी व पोलिसांनी प्रोमेनेडवरील प्रमुख मार्ग, गर्दीची ठिकाणे, प्रवेशद्वारे आणि इतर संवेदनशील भागांचे मूल्यांकन केले. ज्या ठिकाणी सातत्याने देखरेख आवश्यक आहे, अशा जागांची प्राथमिक निवड करण्यात आली असून या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आाहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Five CCTV Cameras Per Panchayat
Santinez Footpath Damage Panaji
CCTV Mandatory in Medical Shops
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com