Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News : गोंधळाच्या पार्श्वभूमीवरही एमबीबीएस प्रवेशासाठी झुंबड; शेकडो विद्यार्थ्यांकडून अर्ज

Panaji News : राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया अद्याप नाही

Panaji News :

पणजी, यंदा ‘नीट’ परीक्षेचा निकाल मोठ्या प्रमाणात लागल्याने एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी झुंबड उडाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तंत्रशिक्षण संचालनालयाने सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांत शेकडो विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर केल्याची माहिती मिळाली आहे.

राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २७ जागांसाठी अद्याप ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झालेले नाही. ते ‘नीट’ परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (एनटीए) संकेतस्थळावर सादर करायचे असतात. असे असले तरी शेजारील जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचे पालन याविषयी विचारणा करण्यासाठी पर्वरीच्या तंत्रशिक्षण संचालनालयात येऊन जात असल्याची माहिती उपसंचालक डॉ. दीपक गायतोंडे यांनी दिली आहे.

७०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला थेट दोन हजारांच्या जवळपास क्रमांक मिळणार आहे. आतापर्यंत या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन याचिका दाखल केल्या आहेत. पहिली याचिका या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच म्हणजेच १ जून रोजी दाखल केली होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच फुटल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

Panaji
Goa News: गोवा काँग्रेसचा 2027 साठी 'अबकी बार 30 पार'चा नारा, निरंकाल-दाभाळ येथे आढळली मगर; ठळक घडामोडी

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात याच प्रकारच्या एका याचिकेवर सुनावणी करताना निकाल जाहीर करण्यास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. जवळपास २.४ दशलक्ष विद्यार्थ्यांनी ५ मे रोजी देशभरातील ५७१ शहरांमध्ये ही प्रवेश परीक्षा दिली

आहे.

यातील १४ शहरे भारताबाहेरील होती. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार, देशभरातील ७०० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण १ लाख ८ हजार ९४० जागा आहेत.

पात्रता गुणांमध्ये प्रचंड वाढ

नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले भरपूर गुण सध्या राज्यात व राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. २०२३ मध्ये फक्त दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळालेले होते. असे असताना यंदा त्यात अभूतपूर्व अशी भर पडून तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

त्यामुळे, ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली आहे.

गुणांबाबत पालकांत संभ्रम

‘नीट’ची परीक्षा एकूण ७२० गुणांची असते. या परीक्षेला गुण मिळवण्याची योजना ही ‘नकारात्मक गुणवत्ता पद्धती’ची असते. म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तराला चार गुण मिळतात, तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो.

त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने सगळे प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला ७२० पैकी ७२० गुण पडू शकतात; मात्र, एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले असेल तर जास्तीत जास्त ७१६ गुण प्राप्त होऊ शकतात. पण, एखाद्याला ७१८ अथवा ७१९ गुण मिळणे निव्वळ अशक्य आहे, अशी चर्चा पालकांत सुरू झाली आहे.

केंद्र सरकारकडून समिती नियुक्त; फेरपरीक्षा होणार नाही

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा ‘एनईईटी-यूजी २०२४’ च्या निकालांवरून उद्‍भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने चौकशी समिती नेमण्याची घोषणा शनिवारी केली.

या परीक्षेच्या निकालात गडबड गोंधळ झाल्याच्या आरोपांनंतर फेरपरीक्षेची मागणी सुरू झाली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत फेरपरीक्षा होणार नसल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com