Prasad Kulkarni
Prasad KulkarniDainik Gomantak

Panaji News : आयुष्यावर प्रेम करायला शिका : प्रसाद कुलकर्णी

Panaji News : गोवा मराठी पत्रकार संघाने भारतीय जनसंपर्क मंडळ गोवा शाखेच्या सौजन्याने येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या छोटेखानी सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता.
Published on

Panaji News :

पणजी, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर, क्षणावर प्रेम करायला शिका, असा संदेश शनिवारी ‘आनंदयात्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्ध कवी, गीतकार, निवेदक, समुपदेशक तथा मराठी शुभेच्छा पत्रांचे लेखक प्रसाद कुलकर्णी यांनी दिला.

गोवा मराठी पत्रकार संघाने भारतीय जनसंपर्क मंडळ गोवा शाखेच्या सौजन्याने येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या छोटेखानी सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसाद कुलकर्णी यांचा हा ७५१ वा कार्यक्रम होता. किस्से, कविता, गमतीदार अनुभव सांगत त्यांनी आनंदयात्रेची रसिकांना सफर घडवून आणली.

औपचारीक सत्रात व्यासपीठावर गोवा मराठी पत्रकार संघाच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष जयंत संभाजी, उपाध्यक्ष वामन प्रभू, सचिव सुभाष नाईक, भारतीय जनसंपर्क मंडळ गोवा विभागाचे अध्यक्ष दीपक नार्वेकर उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुभाष नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

Prasad Kulkarni
Goa's Top News: दूधसागर, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक, अपघात; राज्यातील ठळक बातम्या

पत्रकारांच्या समस्येचा विचार व्हावा

: पुनरुज्जीवित झालेल्या गोवा मराठी पत्रकार संघामुळे मराठी पत्रकारांसमोर ज्या समस्या, आव्हाने आहेत त्यावर गंभीरपणे विचार होण्यास मदत होईल, असे भारतीय जनसंपर्क मंडळ, गोवा विभागाचे अध्यक्ष दीपक नार्वेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com