Indian Coast Guard Tree Plantation
Indian Coast Guard Tree Plantation Dainik Gomantak

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दल जवानांनी लावली २५० रोपे; चिकोळणा येथे वृक्षारोपण

Indian Coast Guard : "आपण एकजूट होऊन झाडे लावू आणि पर्यावरण स्वच्छ करूया" हे ब्रीदवाक्य पाळत सेवा कर्मचारी, कोस्ट गार्ड वाइव्हस वेल्फेअर असोसिएशनच्या महिला, डीएससी, नागरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि २५० हून अधिक रोपे लावली.
Published on

Indian Coast Guard :

पणजी, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दल जिल्हा मुख्यालय क्रमांक ११ गोवाच्या वतीने बुधवारी वास्कोतील चिकोळणा येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण आणि मानवी जीवनावरील त्याचे फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल जवानांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.

"आपण एकजूट होऊन झाडे लावू आणि पर्यावरण स्वच्छ करूया" हे ब्रीदवाक्य पाळत सेवा कर्मचारी, कोस्ट गार्ड वाइव्हस वेल्फेअर असोसिएशनच्या महिला, डीएससी, नागरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि २५० हून अधिक रोपे लावली.

Indian Coast Guard Tree Plantation
Goa Loksabha Election Result: दक्षिण गोव्यात अल्पसंख्याकांची एकजूट ठरली महत्त्वाची; सासष्टीचा गड सर

उपमहानिरिक्षक मनोज भाटिया, टी.एम. डीआयजी कोस्ट गार्ड गोवा क्षेत्र, कोस्ट गार्ड वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशन (सीजीडब्ल्यूडब्ल्यूए) च्या राज्य अध्यक्षा दीपिका भाटिया यांनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com