केबल तुटल्याने पणजी अंधारात

4 वाजून 20 मिनिटांनी ही घटना घडली
Panaji in dark due to broken cable
Panaji in dark due to broken cableDainik Gomantak

पणजी: पणजीतील स्मार्ट सिटीचे जलस्रोत खात्याचे पाणी निचरा प्रकल्पाचे काम सुरू असताना भूमिगत वीजवाहिनी तुटली. यामुळे राजधानी पणजी शहराला शनिवारी चार तास विजेविना राहावे लागले. त्याचा मोठा फटका शहरातील दुकानदार आणि विविध उद्योगाला बसला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या सुरू असलेला उन्हाळा आणि तापमानात झालेल्या वाढीमुळे लोक हैराण झाले.पणजी मळ्यात जलस्रोत खात्याच्या वतीने गटार आणि पाणी निचरा प्रकल्पाचे काम सुरू आहे. याच वेळी बाजुला जाणाऱ्या भूमिगत वीजवाहिन्यांना जेसीबी मशीन लागल्यामुळे त्या तुटल्या. 4 वाजून 20 मिनिटांनी ही घटना घडली. याचा फटका पणजी शहराबरोबर मिरामार, करंजाळे, टोंका, सांतेनेज, याबरोबर ताळगावातल्या काही भागाला बसला. अचानक शहरातील वीज गेल्याने नागरिक उन्हाळ्यातील उकाड्याने त्रस्त झाले. याबरोबरच शहरातील दुकाने आणि छोटे उद्योग बंद ठेवावे लागले. त्यानंतर वीज खात्याने इतर मार्गावरची वीज बंद करून शहराकडे वळवली. मात्र, हे घडेपर्यंत रात्रीचे सात वाजले. त्यामुळे आज राजधानी पणजी तब्बल चार तासांहून अधिक काळ विजेविना राहिली. मग टप्प्याटप्प्याने वीज खात्याला वीज सुरू करण्यात यश आले. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे पणजीकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com