Illegal Constructions in Panaji : हणजूणमधील अवैध बांधकामांवर हातोडा

18 जमीनदोस्त : 38 व्यावसायिक धास्तावले
Illegal Construction hanjun
Illegal Construction hanjunGomantak Digital Team
Published on
Updated on

Illegal Constructions Demolished in Anjuna: हणजूण समुद्रकिनारी क्षेत्रात एनडीझेड अंतर्गत 275 पैकी 100 बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचा आदेश काढण्यात आला होता.

त्यापैकी 18 बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ४४ जणांनी त्याला आव्हान दिले आहे. तर 38 बांधकामे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हणजूण समुद्रकिनारी भागात 275 बांधकामे ही एनडीझेड क्षेत्रात असल्याने ती बेकायदा आहेत, अशी माहिती जीसीझेडएमएमने सादर केलेल्या तपासणी अहवालात दिली होती. त्यानुसार हणजूण पंचायतीने या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

Illegal Construction hanjun
IPL 2023: दिल्लीची झोळी रिकामीच! मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून विजय

या नोटिशीला उत्तर देताना 175 जणांनी सीआरझेड अधिसूचना 1991 अस्तित्वात येण्यापूर्वीची ही बांधकामे असल्याचे पुरावे दस्तावेजसह सादर केले होते. त्यामुळे पंचायतीने ही नोटीस रद्द केली.

उर्वरित100 पैकी 44 बांधकाम मालकांनी पंचायत खात्याकडे नोटिशींना आव्हान देऊन अंतरिम स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे पंचायत खात्याला या आव्हान याचिका चार आठवड्याच्या आत निकालातकाढाव्या लागतील.

Illegal Construction hanjun
Bicholim News : पंधरा दिवसांनी उघडला केळबाई मंदिराचा दरवाजा

२१ पर्यंत माहिती सादर करा

१७५ बांधकामांपैकी प्रदूषण मंडळाने १०९ बांधकामांची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये १६ जणांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठीचा मंडळाचा परवाना आहे.

उर्वरित बांधकामांकडे हा परवाना नसल्यास त्यांचा व्यवसाय बंद करण्यासाठी पावले उचलावी, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या बेकायदा बांधकामाविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती येत्या २१ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com