Traffic Congestion : पणजीला वाहतूक कोंडीचा फटका; बेशिस्त पार्किंगमुळे गोंधळ

Traffic Congestion : पणजीत अनेक रस्ते खोदकामामुळे बंद आहेत. त्यामुळे शहरात येण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्याच रस्त्यांवर वाहने वेगाने पुढे सरकू शकत नव्हती.
Traffic Congestion
Traffic Congestion Dainik Gomantak

Traffic Congestion :

पणजी, शहरात सुरू असलेल्या काजू फेस्ताला भेट देण्यासाठी आपापली वाहने घेऊन आलेले अनेकजण, शहरातील अनेक रस्ते खोदकामामुळे बंद आणि कॅसिनोच्या ग्राहकांचे बेशिस्त पार्किंग यामुळे शनिवारी मोठी वाहतूक कोंडी शहरभर अनेकांनी अनुभवली.

एरव्ही बसस्थानक ते सांतिनेज हे अंतर पाच मिनिटांत कापण्यासारखे असूनही त्यासाठी २०-२५ मिनिटे लागत होती.

शहरात जबरदस्त वाहतूक कोंडी झाल्याने पर्वरी आणि बांबोळीच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मडगावहून पणजीच्या दिशेने येणारी वाहने बांबोळीची उतरंड काढल्यानंतर मंद गतीने पुढे सरकत होती. पर्वरीत चोगम रस्ता आणि ओ-कोकेरो चौकापासून पणजीपर्यंतच्या रस्त्यावर वाहन मंदगतीने चालवावे लागत होते. या मार्गावर दोन ठिकाणी वाहतूक सिग्नल लागतो. त्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठी होती. वाहने त्या सिग्नलपर्यंत पोहोचेपर्यंत लाल सिग्नल पडत होता.

Traffic Congestion
Goa News : गोव्यात ७६.९९ मतदान टक्केवारीने रचला नवा विक्रम; निवडणूक आयोगाची अंतिम आकडेवारी

पणजीत अनेक रस्ते खोदकामामुळे बंद आहेत. त्यामुळे शहरात येण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्याच रस्त्यांवर वाहने वेगाने पुढे सरकू शकत नव्हती. ही वाहतूक कोंडी सांतिनेज ते बसस्थानक परिसरापर्यंत दोनेक तासांसाठी कायम होती. वाहतूक पोलिसांनी कोंडीवर उपाय काढण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र, त्यांच्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे दिसून येत नव्हते.

कांपाल येथील मैदानावर काजू फेस्ताच्या निमित्ताने खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. याशिवाय मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत. यामुळे लोकोत्सव पाहण्यासाठी जसे मोठ्या संख्येने लोक येतात तसे लोक या काजू महोत्सवाच्या निमित्ताने पणजीत आले होते. त्या वाहनांमुळेही कोंडीत भर पडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com