Garba Dance In Goa: गरबा, दांडिया गीतांवर थिरकले पाय

Garba Dance In Goa: पणजीत जल्लोष : केंद्रीयमंत्र्यांच्या उपस्थितीत गुजराती समाजाचा रंगला रास
Garba In Goa Navratri 2023
Garba In Goa Navratri 2023Dainik Gomantak

Garba In Goa: पणजी गुजराती समाज मंडळाच्या गरबा आणि रास दांडियाला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनीही हजेरी लावली होती.

Garba In Goa Navratri 2023
Goa Accident Death: बोरी बगलमार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्‍वार ठार

या सोहळ्यात दांडिया आणि गरबाशी निगडीत गुजराती, हिंदी आणि मराठी, कोकणीतील सुमारे दीडशे गाण्यांवर स्पर्धकांसह उपस्थित आबालवृद्धांनी ठेका धरला.

यावेळी भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दामू नाईक, मंडळाचे अध्यक्ष लता पारेख यतीन पारेख तुषार जोशी, तेजस भट, भाविका शहा, काजल शहा, मुकेश देसाई, नरेश इराणी, अनुपमा पारेख, निखिल शहा उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रुपाला म्हणाले,गुजराती समाजाची आपली संस्कृती जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांचे एकूण समाजाच्या जडणघडणीत व गोव्यात योगदान महत्त्वाचे आहे. गुजराती समाजाच्या कामांना शुभेच्छा, यापुढेही समाजाने राज्याच्या उन्नतीसाठी कार्यरत रहावे,असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com