Panaji
Panaji Dainik Goa

Panaji News : ग्राम पंचायतींच्या नव्या वास्तू दिव्यांगांसाठी त्रासदायक : आवेलिनो डिसा

Panaji News : बिले मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Panaji News :

पणजी, दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ अंतर्गत राज्यातील नव्याने बांधण्यात आलेली सर्व शासकीय इमारती या दिव्यांग सुलभ असणे बंधनकारक आहे, असे असून देखील राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये उभारण्यात आलेल्या आपत्कालीन निवारा इमारती तसेच काही ग्रामपंचायती दिव्यांग सुलभ नाहीत, असे असूनही कंत्राटदारांना इमारतीची बिले मंजुर केल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी गोवा राज्य दिव्यांग हक्क संघटनेचे अध्यक्ष आवेलिनो डिसा यांनी केली.

ते पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, आवेलिनो डिसा म्हणाले, नव्याने उभारण्यात आलेल्या आपत्कालीन निवारा इमारती, रेईश मागुश, गोवा वेल्हा तसेच इतर काही पंचायत इमारती या दिव्यांग सुलभ नाहीत.

हे दिव्यांग व्यक्ती कायदा २०१६ चे उल्लंघन आहे. नूतनीकृत कला अकादमी, मोपा विमानतळही दिव्यांग सुलभ नाही. दिव्यांग सुलभ इमारत म्हणजे केवळ इमारतीच्या प्रवेशद्वारावर रॅम्प घालणे एवढेच नसून प्रवेशयोग्य शौचालये, लिफ्ट, स्पर्श आणि ब्रेल चिन्हे आणि आरक्षित पार्किंग या बाबी गरजेच्या आहेत,असे त्यांनी सांगितले.

Panaji
Goa School Reopening: 'इगो' बाजुला ठेवा! शाळा उशिराने सुरु करण्याबाबत दुर्गादासांची मुख्यमंत्र्यांना पुन्हा विनंत

दिव्यांग आयुक्तांची ‘एनओसी’ सक्तीची करा!

जर नव्याने बांधलेल्या इमारती दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्य नसतील तर ‘पर्पल फेस्ट’ आयोजित करण्यात काही अर्थ नाही. आम्ही राज्याचे दिव्यांग आयुक्त, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी करून नव्याने बांधण्यात आलेल्या सरकारी इमारतींची बिले मंजूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहोत.

कंत्राटदाराला अंतिम बिल मंजूर करण्यापूर्वी सरकारी इमारतींनी दिव्यांग सुलभ असल्याचा ‘ना हरकत दाखला’ राज्य दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडून घेणे बंधनकारक करावे, अशी आमची मागणी असल्याचे आवेलिनो डिसा यांनी सांगितले.

बौध्दिक दिव्यांगांना ‘हायपर ॲक्टिव्हिटी’त्रास सप्टेंबर २०२३ पासून बंद असलेले संजय स्कूल व्होकेशनल सेंटर पुन्हा सुरू करण्याबाबत आम्ही राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांना पत्र लिहिले आहे. गंभीर बौद्धिक अपंगत्व असलेल्या ११० विद्यार्थ्यांना घरी राहण्यास भाग पाडले गेले आहे आणि त्यांना विविध हायपर ॲक्टिव्हिटी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना सरकारी अनुदान बंद करण्याच्या निर्णयाबद्दल राज्याचे दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांचे आभार मानत असल्याचे आवेलिनो डिसा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com