Goa Governor | Sreedharan Pillai
Goa Governor | Sreedharan PillaiDainik Gomantak

Goa News: चोडण-दिवाडीवासीयांची पुलाविषयी मते ऐकून राज्यपालही आश्‍चर्यचकित

Goa News: मये दौऱ्यावेळी दिसून आला नागरिकांचा परस्परविरोधी मतप्रवाह

Goa News: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना मये दौऱ्यादरम्यान आश्‍चर्याचा धक्का बसला. कारण चोडण आणि दिवाडी ही दोन्हीही बेटे जवळजवळ असून, याठिकाणच्या लोकांची मांडवी नदीवरील पुलाविषयीची परस्परविरोधी मते असल्याचे पाहून पिल्लई अवाक् झाले. त्यामुळे त्यांनी पुलाला विरोध करणाऱ्या दिवाडी बेटावरील नागरिकांकडून विरोधाचे कारणही जाणून घेतले.

राज्यपाल पिल्लई यांनी नियोजनाप्रमाणे आज मयेचा दौरा केला. मये मतदारसंघात चोडण व दिवाडी ही बेटे येत असल्याने त्यांना मांडवी नदीवरील पुलाची लोक आपल्याकडे मागणी करतील, असे वाटले.

तसे झालेसुद्धा; पण चोडण बेटावरील लोकांनी राज्यपालांना पूल होण्याविषयी निवेदन दिले, तर दिवाडी बेटावरील नागरिकांनी पुलास विरोध दर्शवला. त्यामुळे राज्यपालांनी पूल न होण्यामागील कारण जाणून घेण्यासाठी काही लोकांशी संवाद साधला.

राज्यपाल ज्या ठिकाणी गेले, तेथे त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. काही ठिकाणी वाजत-गाजत त्यांचे स्वागत करण्यात आले.

Goa Governor | Sreedharan Pillai
Uday Bhembre : ज्येष्ठ साहित्यिक उदय भेंब्रे यांना मानाचा चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पूल नको असल्याची ही कारणे...

जर पूल झालाच तर दिवाडी बेटावरील शांतता संपुष्टात येईल. कोणतेही लोक याठिकाणी ये-जा करतील. आम्हाला बाहेरचे लोक नको आहेत, पर्यावरणालाही हानी पोहोचेल, या भीतीने येथील लोकांनी पूल नको म्हणून राज्यपालांना निवेदन सादर केले.

मात्र, दोन्ही बेटांवरील लोकांनी केलेल्या परस्परविरोधी मागण्या पाहून राज्यपालांनाही आश्‍चर्य वाटले. मात्र, लोकांच्या मागण्या आपण केंद्राला कळवू, असे राज्यपाल म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com