Panaji Fish Rate : पणजीत १०० रुपयांना एक बांगडा; मासळीच्या दरात वाढ

Panaji Fish Rate: आज पणजी बाजारात बांगडा, तारली, खुबे, कोळंबी, इसवण, पापलेट, लेपो, आदी विविध प्रकारचे मासे उपलब्ध होते.
masali bajar
masali bajarDainik Gomantak

Panaji Fish Rate :

पणजी, राज्यात १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू झाल्याने बाजारात मासळीची आवक घटली आहे अशातच मत्सप्रेमी खवय्यांना मासळीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत कारण मासळीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पणजी बाजारात मोठे बांगडे ४०० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत. सर्वसामान्यपणे मोठे बांगडे प्रती किलो चार ते पाच येतात त्यामुळे एकाअर्थी एक बांगडा १०० रुपयांना पडत आहे.

सर्वसामान्यांची आवडत्या तार्लीचे दर ३०० रुपये प्रती किलो झाले आहेत. इसवण १ हजार रुपये किलो तर मध्यम आकाराचे पापलेट ८०० रुपये प्रती वाटा दराने विकले जात आहेत. कोळंबी (सुंगठे) ४५० रुपये किलो, लेपो आकाराप्रमाणे २५० ते ४०० रुपये किलो दराने विकले जात आहे.

आज पणजी बाजारात बांगडा, तारली, खुबे, कोळंबी, इसवण, पापलेट, लेपो, आदी विविध प्रकारचे मासे उपलब्ध होते. आज शुक्रवार असल्याने बाजारात मासळी खरेदीसाठी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती परंतु मासळीचे वाढलेले दर पाहून अनेकांना खरेदी करताना दोनदा विचार करावा लागत असे सर्वसामान्यपणे जो ग्राहक मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी करत होता तो देखील खरेदी करताना विचार करत होता.

masali bajar
Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

अंडी ९० रुपये डझन

राज्यात सद्या अंड्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात ९० रुपये डझन ८ रुपये १ दराने अंडी विकली जात आहेत. पावसाळ्यात मासळी मोठ्या प्रमाणात मिळत नसल्याने अनेक नागरिक मांसाहारी खवय्ये जेवणात ऑम्लेट, बुरजीला पसंती देत असल्याने, अंड्यांना मागणी वाढली आहे त्यामुळे अंडीही भाव खात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com