Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Panaji assault case: पणजी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या खंडणी व मारहाणप्रकरणातील सहा आरोपींना मेरशी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
Patrick Bah Bail Rejected
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या खंडणी व मारहाणप्रकरणातील सहा आरोपींना मेरशी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

हा निर्णय न्‍या. सरिका फळदेसाई यांनी दिला. सदर फौजदारी खटला अबुझर कोतवाल, गणेश पांजळ, रमेश शिरसांगी, विलास तलवार, सिद्धू फडेंनवार आणि सोहेब अख्तर यांच्याविरोधात पणजी पोलिसांनी दाखल केला होता.

Patrick Bah Bail Rejected
Goa Crime: धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार, 47 वर्षीय आरोपीला अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

सरकारी पक्षाच्या मते, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी संशयितांनी तक्रादार शेख बाशा याला पणजीतील कामराभाट परिसरात एका होंडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने कोंडले होते. तक्रारदाराला थप्पड, लाथा आणि प्लॅस्टिक पाईप्‍सने मारहाण केल्याचा आरोप होता. तसेच, संशयितांनी तक्रारदाराच्या पत्नीकडे व्हिडिओ कॉलद्वारे पैशांची मागणी करत धमक्या दिल्याचे नमूद करण्यात आले होते.

Patrick Bah Bail Rejected
Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

या प्रकरणात कलम ३२४, ३४२, ३८६, ५०६(२) सह कलम १४९ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. तथापि, खटल्यादरम्यान तक्रारदार शेख बाशा यांनीच न्यायालयात साक्ष देण्यास नकार दिला. जेव्हा तक्रारदार स्वतःच प्रकरण पुढे नेण्यास इच्छुक नाही, तेव्हा तपास अधिकाऱ्याचे साक्षीपुरावे निरर्थक ठरतात. आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत व सरकार पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com