Environment Day : ‘ज्ञानप्रकाश’च्या ‘एनएसएस’ वतीने पर्यावरण दिन उत्साहात

Environment Day : यावेळी विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचे सदस्य ॲड. सूरज मळीक हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच प्राचार्य जयराम केरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अधिकारी शिक्षिका पौर्णिमा केरकर याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.
Environment Day
Environment Day Dainik Gomantak

Environment Day :

पणजी, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ५ जून रोजी पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचे सदस्य ॲड. सूरज मळीक हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच प्राचार्य जयराम केरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अधिकारी शिक्षिका पौर्णिमा केरकर याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.

आजच्या घडीला पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आणि तो साधण्यासाठी प्रत्येकाला द्यावे लागणारे योगदान याविषयी प्रमुख वक्ते सुरज मळीक यांनी विचार मांडले. पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजेच फुलपाखरू,या फुलपाखरांविषयी विस्ताराने माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.

Environment Day
Goa Assault Case: धारबांदोड्यात प्राणघातक हल्ला करुन एकास लुटले, दोघांविरोधात गुन्हा नोंद

फुलपाखरांचे आयुष्यमान, त्यांचं वेगळेपण विविध राज्य फुलपाखरा विषयीची माहिती आणि एकूणच निसर्ग आणि माणूस यांचे नाते अधोरेखित केले. विद्यार्थ्यानी आपल्या जीवनात ध्येय ठरवून पर्यावरणाशी चांगले नाते निर्माण करावे, असेही विचार मळीक यांनी व्यक्त केले.

पर्यावरणाशी नाते जोडणारा दुवा म्हणजे वृक्ष !

आवळा,चिंच,लिंबू यासारख्या विविध प्रकारच्या देशी झाडांची रोपटे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देऊन हे नाते वृद्धिंगत करण्यात आले.बारावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी गायिलेल्या पर्यावरण गीताने कार्यक्रमाची झालेली सुरुवात करण्यात आली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com