Panaji News : शालेय मुलांकडे सापडताहेत ई-सिगारेट! डॉ. अमिता केंकरे कामत

Panaji News : ६व्या गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, लहान मुलांना तंबाखू उत्पादक आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी विविध प्रकारांचा वापर करतात. सद्यस्थितीत ई-सिगारेट प्रचलित होत असून आम्ही दंतचिकित्सा शिबिरासाठी गेलो असता बारा-तेरा वर्षांच्या मुलांच्या दप्तरांमध्ये ई-सिगारेट सापडत असल्याची खंत गोवा दंतचिकित्सा महाविद्यालयाच्या डॉ. अमिता केंकरे कामत यांनी व्यक्त केली.

गोवा मनोरंजन सोसायटी, गोवा दंत चिकित्सा महाविद्यालय आणि रुग्णालय आणि तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आरोग्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६व्या गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी कामत बोलत होत्या.

यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्ष तथा आमदार दिलायला लोबो, मणिपाल हॉस्पिटलचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर उपस्थित होते.

निर्व्यसनी जीवन जगा!

तंबाखूजन्य पदार्थ शाळकरी मुलांकडे मिळत आहेत, हे धोक्याचे असून आपल्याला ईश्‍वराने सुंदर जीवन दिले आहे त्यामुळे आपण ते चांगल्याप्रकारे व्यतीत करणे गरजेचे आहे. धूम्रपान, तंबाखू सेवनामुळे आपण आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे जीवन धोक्यात टाकतो. तसेच आपली मुले तंबाखूला बळी पडणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे असल्याचे आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले.

तंबाखू सेवन हे ‘स्लो पॉयझन’ : डॉ. साळकर

गोव्यातील ग्रामीण भागात वाळपई, डिचोली, साखळीत अमलीपदार्थ पोहोचले आहेत. अमली पदार्थांसाठी आईवडिलांकडून पैसे मिळविण्यासाठी मुले वेगवेगळी कारणे सांगतात.

मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. गोव्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण दहा टक्क्यांहून कमी आहे. तंबाखू सेवन हे स्लो पॉयजन आहे.

तंबाखू उद्योग हे वेगवेगळ्या प्रकारे मुलांना आकर्षित करतात. देशात १४ वर्षांवरील ५ पैकी १ मुलाने तंबाखूचे सेवन केल्याचे सर्व्हेक्षण आहे.

धूम्रपानाला आळा घालणे हे अमलीपदार्थांना आळा घालण्यासारखे आहे; कारण धूम्रपान ही अमलीपदार्थांकडे वळण्याची पहिली पायरी असल्याचे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

Panaji
Goa Statehood Day: सावंत सरकारचा धिक्कार... सरकारी जाहिरातीत घटकराज्य दिनाच्या कार्यक्रमाचा साधा उल्लेखही नाही; अमरनाथ पणजीकर बरसले

जनहित मे जारी’ प्रथम

६व्या तंबाखूविरोधी चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर लघुपट मागविण्यात आले होते. दोन्ही गटांमध्ये मिळून एकूण २३ लघुपट आले होते. ‘राष्ट्रीय विभाग जनहित मे जारी’ या लघुपटाला प्रथम पारितोषिक देण्यात आले.

दुसरे पारितोषिक - ‘पिळगी’ आणि तिसरे- ‘बच्चो का बचाव’ या लघुपटाला देण्यात आले. राज्यस्तरावरील विभागात ‘भूती’ लघुपटला पहिले पारितोषिक प्राप्त झाले तर दुसरे- ‘शाणपणा’, तिसरे- ‘वीगस ऑफ रिगरेड्स’ला देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com