Panaji News : ‘दृष्टी’कडून ईस्टरच्या आठवड्यात सहाजणांना जीवदान

Panaji News : उल्लेखनीय : आगोंद, बाणावली, कोलवा, पाळोळे, बायणा, हरमल किनारी बचावकार्य
Panaji
PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, दृष्टी जीवरक्षकांनी ईस्टरच्या आठवड्यादरम्यान सहाजणांना गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर बुडण्यापासून वाचवले. त्याचबरोबर जीवरक्षकांनी गेल्या आठवड्यात एकाला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि एका हरवलेल्या मुलाला यशस्वीपणे त्याच्या पालकांकडे सुपुर्द केले.

उपलब्ध माहितीनुसार, आगोंद येथे मुंबईतील ३२ वर्षीय रहिवासी समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ जागेत फसून बुडाल्यानंतर जीवरक्षक सत्यवान वेळीप यांनी त्याला वाचवले. तसेच, कोलकात्यातील एका ४७ वर्षीय महिलेला बाणावली समुद्रकिनाऱ्यावर वाचवण्यात आले. जीवरक्षक गुतेश गावकर यांनी तिला रेस्क्यू ट्यूबचा वापर करून वाचविले.

 कोलवा समुद्रकिनाऱ्यावर आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला वाचवण्यात आले. या युवकाने आपल्या आत्महत्येची योजना गस्त घालणाऱ्या शंकर पर्येकर या जीवरक्षकाला सांगितली. पर्येकर यांनी त्याला शांत करून जवळच्या टॉवरवर नेले आणि पाणी दिले. नंतर पर्येकर यांनी  पोलिसांना बोलावले.

तसेच कोलवा किनाऱ्यावर एक मूल हरवण्याचे प्रकरण घडले होते. पालक पोहण्यात व्यस्त होते. एका जीवरक्षकाला त्रस्त बालक समुद्रकिनाऱ्यावर भटकताना दिसले. त्यांनी लगेच  जीपमधून घोषणा दिल्या. पालक सापडल्यानंतर आणि त्यांची ओळख पटल्यानंतर मुलाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

बायणा समुद्रकिनाऱ्यावर पोहताना बंगळुरू येथील एका १९ वर्षीय व्यक्तीच्या डाव्या पायाला तुटलेल्या काचेमुळे खोल जखम झाली, तर दुसरीकडे हरमल येथे केरळमधील एका व्यक्तीचा डावा हात निखळला. दोघांनाही प्राथमिक उपचार मिळाले.

Panaji
Goa Politics: काँग्रेस राजवटीत घोटाळेच; श्रीपाद नाईक यांचे विधान

‘कयाक’मध्ये बिघाड

पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर, २४ वर्षीय हैदराबाद येथील युवक  किनारपट्टीपासून सुमारे ७०० मीटर अंतरावर कयाकिंग करत असताना त्याच्या कयाकमध्ये बिघाड झाला. हे कळल्यानंतर  एका जेट स्की ऑपरेटरला सावध करण्यात आले आणि चालकाने त्याला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.

खोला नदीवर नोंदवलेल्या अशाच एका घटनेत बंगळुरूमधील दोन पुरुष कायाकिंग करताना त्यांचे कयाक पाण्यात उलटले जीवरक्षक महेश वेळीप यांनी सर्फबोर्डच्या मदतीने पाण्यात धाव घेत त्यांना वाचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com