Panaji News : तब्बल तीन कोटींची रक्कम असूनही नसल्यासारखीच; म्हापशातील दाम्पत्याच्या मुलांची दुर्दैवी कहाणी

Panaji News : एका बँकेच्या लॉकरमध्ये आई-वडिलांनी मृत्युपूर्वी ठेवलेल्या तब्बल तीन कोटी रुपयांच्या रकमेचा त्यांच्या विदेशातील मुलांना काडीमात्र उपयोग होणार नाही. नोटबंदीमुळे ही रक्कम कालबाह्य झाल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे.
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, बँकेत कितीही मोठी रक्कम असो, पण उपयोगात येत नसेल तर ती निरूपयोगीच ठरते. अशीच काहीशी विचित्र परिस्थिती म्हापशातील एका दाम्पत्याच्या मुलांवर ओढवली.

एका बँकेच्या लॉकरमध्ये आई-वडिलांनी मृत्युपूर्वी ठेवलेल्या तब्बल तीन कोटी रुपयांच्या रकमेचा त्यांच्या विदेशातील मुलांना काडीमात्र उपयोग होणार नाही. नोटबंदीमुळे ही रक्कम कालबाह्य झाल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे.

बार्देश तालुक्यातील एका गृहस्थाचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांची पत्नी आधीच निवर्तली होती. या दाम्पत्याची मुले परदेशात असतात. या दाम्पत्याने म्हापसा येथील एका को-ऑपरेटिव्ह बँकेतील एकूण तीन लॉकरमध्ये दागदागिने आणि रोख रक्कम ठेवली होती. त्यातील दोन पतीच्या, तर पत्नीच्या नावे एक लॉकर होते. पत्नीच्या निधनानंतर पतीच तिचे लॉकर हाताळत असे.

Panaji
Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

अन् मुलांसह अधिकारीही धास्तावले

सोमवारी बँकेतील लॉकर्स जेव्हा बँक अधिकाऱ्यांनी मुलांच्या देखत उघडली, तेव्हा लॉकर्समधील पैशांची बंडले पाहून मुलांसह बँक अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी ५०० रुपये आणि १ हजार रुपयांची सर्व बंडले बाहेर काढली.

अधिकाऱ्यांनी मोजल्यावर ती रक्कम तब्बल ३ कोटी रुपये असल्याचे दिसून आले. पण, यातील एकाही पैशाचा मुलांना आता फायदा होणार नाही. कारण केंद्र सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या आहेत. नोटबंदीमुळे त्यांना आई-वडिलांच्या संचितावर पाणी सोडावे लागले. त्यांना केवळ दागिन्यांवरच समाधान मानावे लागले.

...तर ही वेळ टळली असती

वडिलांचे निधन झाल्यानंतर १२ वर्षांनी या दाम्पत्याची मुले परदेशातून गोव्यात आली. त्यांनी गोव्यातील मालमत्ता विकून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलार्जित घरात त्यांना बँकेची काही कागदपत्रे आणि लॉकरच्या चाव्या सापडल्या.

मुलांनी या बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. खातरजमा केल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी मुलांना ती लॉकर्स उघडण्यास परवानगी दिली. जर दाम्पत्याने आधीच मुलांना या पैशांविषयी माहिती दिली असती, तर ही वेळ टळली असती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com