Panaji Corporation
Panaji Corporation Dainik Gomantka

Panaji Corporation : राजधानीत कंत्राटी कामगारांकडून सफाई

Panaji Corporation : नव्या संरचनेनुसार स्मार्ट सिटीच्या कामांची आखणी
Published on

Panaji Corporation :

पणजी, महानगरपालिकेने जानेवारी महिन्यात गटारांची सफाई केली होती, त्यानंतर टप्प्याटप्प्याने गटारांची सफाई सुरू आहे.

कंत्राटी कामगारांच्या मदतीने ही सफाई होत असून, ज्या ठिकाणी गटारांची सफाई केली जात आहे, त्या ठिकाणी साचलेला गाळ पाहून दोन-तीन वर्षांपासून ही सफाई झाली नसावी, असा अंदाज येतो.

महानगरपालिका कार्यक्षेत्रात ताळगाव विधानसभा मतदारसंघातील काही भाग येतो. सध्या महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत, त्यामुळे नव्या संरचनेनुसार गटारांची आणि रस्त्यांची निर्मिती केली जात आहे.

तयार झालेली गटार व्यवस्था जोपर्यंत महानगरपालिकेच्या ताब्यात येणार नाही, तोपर्यंत तिची जबाबदारी स्मार्ट सिटीचे काम करणारे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास महामंडळ (आयपीएससीडीएल) पाहणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेची एक जबाबदारी हालकी झाली आहे.

ज्या रस्त्यांची कामे करावयाची बाकी आहेत, त्या बाजूच्या गटारांची सफाई करण्याचे काम महानगरपालिकेला करावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने आल्तिनोचा समावेश होतो.

Panaji Corporation
Goa Congress: मांद्रेवासीय मांद्रेचो भूमिपुत्र भाईना प्रचंड मताधिक्य देतील; युरी आलेमाव यांचा विश्वास

सध्या सांतिनेजमधील काही रस्ते तसेच कांपाल परिसर, मार्केट परिसर आणि महात्मा गांधी रस्ता व आत्माराम बोरकर रस्त्याच्या बाजूच्या गटारांची सफाई करण्याचे काम महापालिकेच्या हातात आहे. त्यातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे.

महानगरपालिकेने यापूर्वीच अडथळा ठरणाऱ्या व धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे. त्याशिवाय ज्या नगरसेवकांकडून धोकादायक फांद्यांविषयी सूचना येतात, त्यावेळी त्या छाटल्या जातात.

पणजी शहरातील सुमारे ८० टक्के गटार सफाईचे काम पूर्ण झाले आहे. मध्य पणजीतील सफाईचे काम बाकी राहिले आहे. या कामासाठी सुमारे १०० कामगार कामाला लावण्यात आले आहेत.

- रोहित मोन्सेरात, महापौर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com