VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Panaji club fight: पणजी येथील एका क्लबबाहेर रविवारी पहाटे आपापसांत हाणामारी करून शांतताभंग केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे.
Panaji club fight
Panaji club fightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येथील एका क्लबबाहेर रविवारी पहाटे आपापसांत हाणामारी करून शांतताभंग केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या प्रसारमाध्यमांत व्हायरल झाला असून ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे वारंवार असे प्रकार घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ४.४५ च्या सुमारास एका क्लबजवळ संशयितांनी चार-चार जणांचा गट करून एकमेकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १९४(२), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Panaji club fight
Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

याप्रकरणी पणजी पोलिसांनी प्रचय कोलपटे (वय २१, रा. चिंचोणे), जेडॉन रिबेलो (वय १९, रा. चिंचोणे), एलरॉय व्हिएगस (वय २२, रा. चिंचोणे), अशबेल फेर्रांव (वय २२, रा. चिंचोणे), मुकेश सिंग (वय २१, रा. सांताक्रूझ), रॉयडन मिस्किता (वय २२, रा. करंजाळे), जॉय फर्नांडिस (वय २२, रा. बाणावली) आणि जोसेफ कार्दोज (वय २१, रा. सांताक्रूझ) यांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी तक्रार नोंदविली आहे.

Panaji club fight
Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

वाहतूक कोंडी अन् बेशिस्त पार्किंग

याच ठिकाणी वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगचे प्रकार घडत असल्याने यापूर्वी ‘गोमन्तक’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर दोन आठवडे याठिकाणी वाहतूक नियंत्रक विभागाने येथे बॅरिकेट्स उभारले. परंतु आता पुन्हा तीच स्थिती आहे.

एका बाजूला कॅसिनोंची संख्या वाढल्याने परराज्यांतील पर्यटकांची पणजीत रात्री उशिरापर्यंत ये-जा सुरू असते. त्यामुळे पणजीचे नाव बदनाम होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com