Goa BJP : चोडणकर राजीनाम्याच्या तयारीत; तीन वर्षांहून अधिक काळ पदावर...

वैयक्तिक कामामुळे मुक्त व्हायचेय’
shubham Chodankar
shubham ChodankarGomantak Digital Team
Published on
Updated on

Goa BJP : पणजी भाजप मंडळ अध्यक्षपदाची सूत्रे तीन वर्षांपूर्वी हाती घेतलेले शुभम चोडणकर सध्या या पदापासून दूर जाण्याच्या तयारीत आहेत. त्याविषयी त्यांनी वरिष्ठांनाही या पदातून मुक्त होणार असल्याचे कळविले आहे.

त्यावेळी त्यांनी हे पद घेण्यास समर्थता दर्शविली नव्हती, परंतु वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे त्यांनी ते पद घेतले. आता तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. हे पद आपण आपल्या कामातील व्यस्ततेमुळे सोडणार असल्याचे ते सांगत असले, तरी त्याच्या मागे वेगळेच कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

shubham Chodankar
CNG-PNG Price: महागाईत जनतेला मोठा दिलासा, CNG 8 रुपयांनी स्वस्त, PNG चे ही दर घसरले

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चोडणकर यांना राजकारणात आणले. नगरसेवक ते महापौर असा त्यांचा प्रवासही झाला. सध्या ते नगरसेवक असून कोरोना महामारीपूर्वी त्यांच्याकडे पणजी भाजप मंडळाचे अध्यक्षपद आले.

रोजच शहरातील नागरिकांचे संबंध येत असल्याने शहरातील लोक समस्या मंडळ अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मांडतात. आमदार, महापौर तथा कोणीच समस्या ऐकून घेत नाहीत म्हटल्यावर नागरिक भाजपचे मंडळ अध्यक्षांना पकडत आहेत.

त्या समस्या ऐकून किती दिवस घ्यायच्या, असा प्रश्‍न कदाचित चोडणकर यांना सतावत असावा. म्हणून कदाचित चोडणकर बाजूला होत असावेत असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

shubham Chodankar
Goa Leopard : भक्ष्य शोधत आला अन् विहिरीत पडला; गावात एकच खळबळ

वैयक्तिक कामामुळे मुक्त व्हायचेय’

शुभम चोडणकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की आपणास वैयक्तिक कामामुळे अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. त्याशिवाय एससी-ओबीसी आर्थिक विकास महामंडळावर केलेली नियुक्तीही रद्द करण्याची विनंती वरिष्ठांना केली असल्याचे कळविल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com