Murder inspired by TV shows : 'क्राईम शो बघून करायचा खून', पणजीत कामगाराचा काटा काढण्यापूर्वी तिवारीने युपीत व्यावसायिकाची केली होती हत्या

Goa Murder Case: भाटले-पणजी येथील जॉन याचा खून करण्यासाठी संशयित अरविंद तिवारी याने वापरलेला चाकू पणजी पोलिसांनी जप्त केला आहे.
Goa Latest Crime News
Crime | ArrestCanva
Published on
Updated on

Panaji Bhatale Murder Case Arvind Tiwari Background

पणजी: भाटले-पणजी येथील जॉन याचा खून करण्यासाठी संशयित अरविंद तिवारी याने वापरलेला चाकू पणजी पोलिसांनी जप्त केला आहे. संशयिताची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची असून यापूर्वी त्याने उत्तर प्रदेशमधील एका व्यावसायिकाचा खून केला होता व इतर काही गुन्ह्यांमध्येही त्याच्यावर तक्रारी दाखल आहेत. टीव्हीवर क्राईमसंदर्भात दाखवण्यात येणाऱ्या मालिकांमधून माहिती घेऊन गुन्हे केल्याचे चौकशीत सांगितले आहे, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली.

संशयित अरविंद तिवारी याने २०१५ साली लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील गौतम बॅनर्जी नामक व्यावसायिकाचा इतरांच्या साथीने खून केला होता. त्याला अटक झाली होती. २०१८ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती. जामिनावर सुटका झाल्यापासून तो तेथील न्यायालयातील खटल्यावरील सुनावणीला उपस्थित राहिलेला नाही.

Goa Latest Crime News
Sunburn Festival: 'न्यायालयाच्या निर्णयानंतर आमची भूमिका होणार स्पष्ट'; आमदार आर्लेकर ‘सनबर्न’ विरोधाबाबत ठाम

तो गेल्या ३ नोव्हेंबरला गोव्यात आला होता व भाटले येथील बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. त्याला कंत्राटदाराने प्रतिदिन ८०० रुपये मजुरी देण्याचे मान्य केले असताना त्याला ६०० रुपये प्रतिदिन या हिशोबाने २७ दिवसांचा पगार दिला होता. त्यामळे त्याला राग होता. यावेळी जॉन याने काही क्षुल्लक कारणावरून आपली चेष्टा करण्यास सुरुवात केल्यावर रागाच्या भरात तेथे असलेल्या चाकूने त्याचा गळा चिरला, अशी कबुली अरविंदने पोलिसांकडे दिली आहे.

Goa Latest Crime News
Bicholim Crime: गहाळ की चोरी! डिचोलीत महिलेचे सात लाखांचे दागिने गायब; पोलिस तपास सुरु

मालिका बघून गुन्हे

टीव्हीवर गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या मालिका दाखवल्या जातात त्यातून गुन्हे केले आहेत. या गुन्ह्याबाबत कोणताही पश्‍चात्ताप वाटत नाही, असे आरोपी अरविंदने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com