Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

Panaji News : पालकांनी करावे मुलांना मार्गदर्शन
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, दहावी हा शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा. त्यामुळे हा टप्पा अचूकपणे पार करणे महत्त्वाचे ठरते.

बऱ्याचदा मुले आपल्या मित्र-मैत्रिणीने निवडलेल्या शाखेत प्रवेश घेतात व वर्ष-दोन वर्षांनंतर विषय अवघड आहेत, क्षेत्राची आवड नाही किंवा अभ्यासक्रम कंटाळवाणा आहे, अशी कारणे देऊन शिक्षण अर्धवट सोडून निघून जातात.

Panaji
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

मी स्वतः कॉलेजमध्ये अशी कितीतरी उदाहरणे पाहिली आहेत. नीट पडताळणी न करता घेतलेल्या निर्णयांमुळे फक्त तुमचे शैक्षणिक वर्ष वायाच जात नाही तर तुमच्या आततायीपणामुळे त्या शाखेत खरोखर प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यालाही आपल्या आवडत्या करिअरला रामराम ठोकावा लागतो.

दहावीनंतर गणित, विज्ञान, कला या विषयांची मूलभूत कल्पना ही प्रत्येकाला आलेलीच असते. याचाच संदर्भ घेऊन आपणच स्वतःला काही प्रश्न विचारावे. ज्या शाखेत मी प्रवेश घेऊ पाहत आहे तो विषय मला आवडतो का? या शाखेत पदवी मिळविल्यानंतर माझ्या इच्छेनुसार मला आयुष्यात पुढे जाता येईल का?

या शाखेतील अभ्यासक्रमात कोणकोणते विषय आहेत? तांत्रिक विषयांबद्दल कल्पना नसल्यास शिक्षक, मोठे भाऊ-बहीण किंवा नातेवाईकांशी बोलून समजून घ्यावे. गुगल करून त्या शाखेसंबंधी माहिती जाणून घ्यावी. पालकांनीही मुलांचे सुप्त गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करण्यावर भर द्यावा. पाळण्यात असतानाच तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या एकविसाव्या शतकातील पाल्यांवर करिअर निवडीच्या बाबतीत आपले निर्णय लादणे चुकीचे ठरेल.

एखादा विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान, वाणिज्य, कला किंवा व्यावसायिक प्रशिक्षणापैकी कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकतो. त्याव्यतिरिक्त तंत्रनिकेतन संस्था (पाॅलिटेक्निक/डिप्लोमा) व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यासारख्या संस्थांमधूनही प्रवेश घेण्याचा पर्याय आहे.

अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांबद्दल सांगायचे झाले तर गोवा राज्यात पणजी, मडगाव, फर्मागुढी, होंडा, काणकोण, म्हापसा, पेडणे, वास्को, काकोडा, डिचोली मिळून एकूण १० सरकारी तर इंडो-जर्मन शिवोली, मोंटफोर्ट खोर्ली व सेसा-साखळी मिळून तीन खासगी संस्था आहेत.

गतवर्षीच्या विद्यार्थी भरतीचा आढावा घेतल्यास, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या या १० सरकारी संस्था ४२ वेगवेगळ्या शाखांमधून (ट्रेड) ४,०७८ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देतात (शैक्षणिक वर्षासाठी स्वीकारले जाणारे प्रवेश व शाखांची संख्या मागणी तितका पुरवठा या तत्त्वावर कमी जास्त होऊ शकते).

इतर तीन खासगी संस्था ९ शाखांमधून २१६ विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्या अंतर्गत आयटीआयच्या विविध शाखा आणि अभ्यासक्रमाची माहिती https://dsde.goa.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Panaji
Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

नापास झालेल्यांनाही मिळते संधी

दहावीत एक-दोन विषयांत नापास झालेले विद्यार्थीदेखील सिव्हिंग टेक्नोलाॅजी, ड्रायव्हर कम मॅकेनिक, वेल्डर, वायरमन, प्लंबर, वुड वर्क टेक्निशियनसारख्या शाखांमधून प्रवेश घेऊन दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर इच्छेनुसार आपला ट्रेड बदलू शकतात.

एखादा विद्यार्थी आयटीआय केल्यानंतर डिप्लोमा व नंतर पदव्युत्तर अशी शिक्षणाची शिडी चढत अभियांत्रिकी पदवी प्राप्त करू शकतो.

विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यास बारावीनंतर डॉक्टर, नर्स, फार्मासिस्टसारखे पर्याय आहेत. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यास सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) तर कला शाखेतून पत्रकारिता, व्यवसाय प्रशासन यासारख्या पर्यायांचे दरवाजे उघडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com