Chorao Raibandar ‘रो-रो’ फेरीसेवा होणार सशुल्क! दुचाकी, चारचाकींना आकारणार तिकीट; मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय

Ro-Ro Ferry In Goa: नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा ‘बांधा आणि चालवा’ तत्त्वावर खासगी कंपनीकडून चालवली जाणार आहे.
Ro-Ro Ferry In Goa
Ro-Ro Ferry In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चोडण ते रायबंदर या महत्त्वाच्या जलमार्गावर प्रस्तावित असलेली ‘रो-रो’ फेरीबोट सेवा लवकरच सशुल्क करण्यात येणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी तिकीट आकारले जाणार आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा ‘बांधा आणि चालवा’ तत्त्वावर खासगी कंपनीकडून चालवली जाणार असून त्याबदल्यात कंपनी सरकारला महसूल देणार आहे. सध्या या मार्गावर पारंपरिक फेरीबोट सेवा निःशुल्क आहे.

या मार्गावर वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीस लागणारा वेळ लक्षात घेता अधिक वेगवान, सुरक्षित आणि उच्च क्षमतेची सेवा पुरवण्यासाठी ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी तिकीट आकारणीचा निर्णय घेण्यात आला. गोव्यातील जलवाहतूक व्यवस्थेत ‘रो-रो’ फेरीबोट ही एक क्रांतिकारी घडामोड ठरणार असून यामुळे केवळ वेळ व इंधनाची बचत होणार नाही, तर गोव्यातील वाहतूक व्यवस्थेला एक नवीन गतीही मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

काय आहे ‘रो-रो’ सेवा?

‘रो-रो’ म्हणजेच फेरीबोट सेवा ही एक आधुनिक वाहतूक पद्धत आहे, जिच्यात वाहनचालक आपल्या वाहनासह थेट बोटीत चढतात आणि विरुद्ध किनाऱ्यावर उतरतात. या प्रकारात वाहन खाली उतार-चढाव करत न जाता सरळ चाकांवरून आत-बाहेर जात असल्यामुळे वेळेची मोठी बचत होते. या प्रणालीत माणसे व वाहने एकाच वेळी स्थानांतरित होतात.

क्षमतेचा अंदाज

दैनंदिन वापराच्या अंदाजानुसार, चोडण–रायबंदर या जलमार्गावर दररोज सुमारे ४,५०० दुचाकी आणि १,५०० चारचाकी वाहने फेरीबोटीने प्रवास करतात. त्यामुळे, सेवा सशुल्क केल्यास दिवसाला ५० हजार रुपयांहून अधिक महसूल मिळू शकतो, असा अंदाज बैठकीत वर्तवण्यात आला आहे.

Ro-Ro Ferry In Goa
Ro-Ro Ferry In Goa: नदी परिवहनच्या 'रो-रो' फेरीबोटीची झुआरी नदीत चाचणी; एक फेरीबोट लवकरच सेवेत दाखल, दुसऱ्या बोटीचे काम पूर्णत्वाकडे

मंत्री साधणार ग्रामस्थांशी संवाद

या तिकीट आकारणीसंदर्भात नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हे चोडण व रायबंदर या दोन्ही किनाऱ्यांवरील ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत. नागरिकांचा विरोध न होता, सेवा यशस्वीपणे सुरू व्हावी यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.

Ro-Ro Ferry In Goa
Chorao Raibandar Ro-Ro Ferry: प्रतिक्षा संपली! रो-रो फेरीबोट ‘द्वारका’ चोडणला दाखल; 1 जूनपासून येणार सेवेत

‘रो-रो’ सेवेमुळे होणारे फायदे

वेळेची बचत : पारंपरिक फेरीबोटीच्या तुलनेत ‘रो-रो’ सेवा जलद व सुलभ आहे.

वाहतुकीचा गोंधळ कमी : दोन्ही किनाऱ्यांवर होणारी वाहनांची गर्दी कमी होईल.

सुरक्षितता : या बोटींमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले असून प्रवाशांची सुरक्षितता अधिक आहे.

पर्यावरणपूरक : वाहनांचे इंजिन थांबवूनच प्रवास होतो, त्यामुळे इंधनाची बचत व प्रदूषण कमी होते.

चढणे उतरणे सुलभ ः ‘रो रो’ फेरीसेवेत एका बाजूने चढून दुसऱ्या बाजुने उतरण्याची सोय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com