Goa Elaction : P Chidambaram
Goa Elaction : P ChidambaramDainik Gomantak

पी चिदंबरम पुन्हा गोवा दौऱ्यावर

सध्या राज्यात कॉंग्रेसला गळती लागलेली असून माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांच्यानंतर आमदार आलेक्स रेजीनाल्ड हेही पक्ष सोडण्याच्या तायरीत आहेत.
Published on

पणजी: गोवा प्रदेश कॉंग्रसचे ( Goa Congress) मुख्य निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रिय गृहमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) हे येत्या आठवड्यात चार दिवसाच्या गोवा (Goa) दौऱ्यावर येणार आहे. सध्या राज्यात कॉंग्रेसला गळती लागलेली असून माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांच्यानंतर आमदार आलेक्स रेजीनाल्ड हेही पक्ष सोडण्याच्या तायरीत आहेत. आज आमदार रेजीनाल्ड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी रेजीनाल्ड यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली व पत्रकार परिषदही घेण्यास लावली.

Goa Elaction : P Chidambaram
राज्यात विद्यपिठाचे प्रशासन ढासळले

मात्र आज रेजीनाल्ड जे बोलले त्यावर ते कायम ठाम राहतील की नाही याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पी चिदंबरम गोव्यात दाखल झाल्यानंतर तेही रेजीनाल्ड यांची समजूत काढतील. तसेच निवडणुकीनंतर कॉंग्रेसला सत्ता मिळाली तर रेजीनाल्ड यांना मोठी जबाबादारी देण्याचे आश्‍वासनही चिदंबरम देऊ शकतात. कॉंग्रेसमधील गळती रोखण्यासोबतच आमदार रेजीनाल्ड यांच्यासह इतर नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे काम चिदंबरम यांना करावे लागणार आहे.

Goa Elaction : P Chidambaram
भाजप च्या पणजी मंडळातर्फे आज आयुर्वेदीक शिबीराचे आयोजन

प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पी चिदंबरम हे ८ ऑक्टोंबर रोजी रात्री किवा ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी गोव्यात दाखल होणार आहेत. चार दिवस ते गोव्यात असतील. राज्यातील काही मतदारसंघाच्या गट समिती व मुख्य कार्यकर्त्यांच्या बैठका ते या दौऱ्यात घेणार आहेत. अशी माहिती शेख यांनी दिली.

युतीच्या बोलणीबाबत माहित नाही

चिदंबरम हे गोव्यात आल्यानंतर मतदारसंघाचे दौरे करुन गट समित्यासोबत त्यांच्या बैठका होणार असल्याची आपणास माहिती आहे. समविचारी पक्षासोबत युतीबाबत ते यावेळी बोलतील वा चर्चा करतील की नाही हे आपणास माहित नाही.

एम. के शेख (उपाध्यक्ष, प्रदेश कॉंग्रेस)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com