आप आणि तृणमूल काँग्रेस गोव्याच्या निवडणुकीत 'फक्त नावाचे खेळाडू': चिदंबरम

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहेत. यातच आता छोट्याशा गोव्यातही विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत.
P. Chidambaram
P. ChidambaramDainik Gomanatk
Published on
Updated on

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी प्रयत्न सुु केले आहेत. या सगळ्या पाश्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी म्हटले आहे की, गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) "फक्त नावाचे खेळाडू" असतील. भाजपला पराभूत करण्यासाठी आणि पुढील सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस सर्वोत्तम स्थितीत आहे. चिदंबरम हे गोव्यातील पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक आहेत.

ते पुढे म्हणाले की, गोव्यातील तृणमूल काँग्रेसचा प्रवेश पक्षाच्या उच्च नेतृत्वाकडून "लादलेला" असल्याचे दिसून येत आहे. कारण तो मुख्यतः पश्चिम बंगालमधील (West Bengal) पक्ष आहे. तसेच ममता बॅनर्जी इतर राजकीय पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेत गोव्यात आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

चिदंबरम यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही छोट्या पक्षाशी युती करणे तेव्हाच शक्य असेल जेव्हा काँग्रेसची बिगर भाजप युतीमध्ये मध्यवर्ती भूमिका असेल.

तसेच ते पुढे म्हणाले, "गोवा हे त्या पाच राज्यांपैकी एक आहे, जिथे पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. तसेच इतर राज्येही तितकीच महत्वाची आहेत. गोवा देखील त्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. काँग्रेस आणि गोव्यातील लोकांचे दीर्घ आणि विशेष नाते आहे. त्याचबरोबर गोवा आणि गोव्यातील लोकांचे अद्वितीय जीवनशैली आहे.” 2022 च्या निवडणुका जिंकून काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने आम्ही रिंगणात उतरत आहोत.''

P. Chidambaram
2017 साली दिग्विजय सिंहांचा घोळ गोवा काँग्रेसच्या अंगलट आला होता

काँग्रेस आणि भाजपला गोव्यातील मुख्य पक्ष असल्याचे सांगताना चिदंबरम म्हणाले की, छोट्या पक्षांशी युती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा बिगर भाजप युतीमध्ये काँग्रेसची मध्यवर्ती भूमिका असेल. जर लहान पक्षांचा युतीकडे कल असेल तर त्यांना काही जागा दिल्या जाऊ शकतात. तथापि, आम्ही कोणत्याही पक्षाबद्दल अंदाज लावू शकत नाही.

त्याचवेळी, गोव्यातील आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस (TMC) संदर्भात चिदंबरम म्हणाले की, हे दोन्ही पक्ष 2022 च्या निवडणुकीत मोठी भूमिका बजावणार नाहीत. आपने 2017 च्या निवडणुकीमधून प्रवेश केला आहे, परंतु त्यांना म्हणावा तसा प्रभाव पाडता आलेला नाही. सप्टेंबर 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसने गोव्यात प्रवेश केला. मात्र त्यांच्याकडे स्थानिक आणि तळागाळातील कार्यकर्तेच नाहीत.

चिदंबरम पुढे म्हणाले, "जिथे काँग्रेसचा संबंध आहे, आमचा विश्वास आहे की आम्ही भाजपला हरवून सरकार स्थापनेसाठी चांगल्या स्थितीत येऊ. जर लहान पक्षांचा कल आमच्याकडे असेल तर आम्ही त्यांनाही मदत करु."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com