गोव्यातील शाळा सुरू करण्याच्या सरकारी निर्णयाबाबत पालकवर्गातून तीव्र नाराजी

शालेय गणवेश व इतर स्टेशनरी साहित्य खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी
Goa School Latest Update
Goa School Latest Update Dainik Gomantak

मडगाव: राज्यातील 1 ली ते 12 वी पर्यंतची शाळा 21 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असुन, शासकीय परिपत्रक जाहिर झाल्यामुळे शुक्रवारपासुन शालेय गणवेश व इतर स्टेशनरी साहित्य खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी झाली.

Goa School Latest Update
पेडण्यातील ‘ते’ गेस्ट हाऊस पाडण्याचा ‘एनजीटी’चा आदेश

दरम्यान, एवढ्या शॉर्ट नोटीसवर दोन वर्षांनी शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्याने अनेक पालक शिक्षण विभागावर संतापले आहेत. शालेय गणवेश आणि स्टेशनरी विकणाऱ्या दुकानांवर मोठी गर्दी होती. शालेय शूज विकणाऱ्या दुकानांमध्येही गर्दी होती.

पालकांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रीयेत त्यांनी अपल्या भावना व्यक्त केल्या, "पालकांची जर दोन मुले प्राथमिक शाळेत शिकत आसतील तर त्यांना इतक्या कमी कालावधीच्या सूचनेवर शाळा पुन्हा सुरू केल्याबाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली",

त्या पुढे म्हणाल्या की, शाळा पुन्हा सुरू करण्याच्या विरोधात नाहीत. मात्र त्यासाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा होता. चालू शैक्षणिक वर्ष पुढील काही दिवसात संपणार आहे. सरकारने नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळा पुन्हा सुरू करायला हव्या होत्या. घाई करण्याची गरज नव्हती.

मध्यवर्ती शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक आणि बहुउद्देशीय उच्च माध्यमिकचे प्राचार्य बोर्डा जोस गोम्स यांनी सांगितले की, शाळांमध्ये सध्या अकरावीच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच ते पुढे म्हणाले, "आम्ही बॅचनिहाय वर्गांची प्रणाली फॉलो करत आहोत, परंतु आमचा भर थिअरी आणि प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करण्यावर आहे,"

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सालसेतच्या अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाची माहिती अद्याप दिलेली नाही. एकंदरीत शासनाच्या या निर्णयावर पालकवर्गातून तीव्र नाराजी उमटत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com