Technical Education : पणजी जग विज्ञान-तंत्रज्ञानाकडे वळलेले आहे. दरवर्षी २५ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. म्हणजेच हा युवा वर्ग असतो, त्या २५ हजारांतून पुढे विविध शाखांमध्ये प्रवेश घेतात, पण केवळ ५ हजार विद्यार्थी तंत्रशिक्षणाकडे वळतात.
कारण इतर विद्यार्थी गणित विषयाला घाबरतात त्यामुळेच ते तंत्रशिक्षणाकडे वळत नाहीत, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
शिवग्राम एज्युकेशन सोसायटीच्या शिरोडा उच्च माध्यमिक शाळेच्यावतीन नवव्या ‘यंग सायन्टिस्टस् २०२३‘ महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘यंग सायन्टिस्ट्स'' आयोजनामागील उद्देश त्यांनी याप्रसंगी विषद केला.
याप्रसंगी शिवग्राम एज्युकेशन सोसायटीचे संचालक सचिन शिरोडकर, श्री रायेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राचार्य जतिन शिरोडकर, शिरोडा उच्च माध्यमिक स्कूलचे ईश्वर हेगडे, यंग सायन्टिस्ट्सच्या प्रमुख शुभदा शिरोडकर यांची उपस्थिती होती.
मंत्री शिरोडकर म्हणाले, कला-वाणिज्य शाखेतून प्रवेश घेणाऱ्यांचा सरकारी नोकरी आणि राज्यातच नोकरी करण्याकडे त्यांचा कल असतो. परंतु तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी जगाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येतात.
त्यात सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश असतो. शिरोडा येथे होणाऱ्या नवव्या यंग सायन्टिस्टस् महोत्सव विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने आयोजन केल्याचे त्यांना सांगितले. १ व २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या यंग सायन्टिस्टस् महोत्सवात ३५ उच्च माध्यमिक शाळा सहभाग आहे.
गोव्यातील तंत्रशिक्षण घेतलेले विद्यार्थ्यी इतर राज्यांच्या तुलनेत बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या करीत आहेत. अधिकाधिक विद्यार्थी तंत्रशिक्षणाकडे वळल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
गुरूवारी शुभारंभ!
सचिन शिरोडकर म्हणाले, नवव्या यंग सायन्टिस्ट्सवतीने दोन दिवसीय महोत्सव आयोजिला आहे. उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी रिल मेकर, जीनियस जेन्स (कोड डबिंग कॉम्पिटिशन), दि ग्राफीक आर्टिस्ट (वेब डिझायनिंग कॉन्टेस्ट), बॉब दी बिल्डर, पॉलिनेशन ॲण्ड पॉलिंटर्स (फोटोग्राफी स्पर्धा),
सायन्स ॲट वर्क, दी माझे (ट्रेझर्स हन्ट), मास्टरमाईंड (प्रश्नंजुषा), इनोव्हेट इन दी गेमिंग असा उपक्रमांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता या महोत्सवाचा शुभारंभ होईल. या महोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख रखमेची बक्षिसे दिल जाणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.