GMC ऑर्थोपेडिक्स विभागात पार पडली पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया, ठरले देशातील पहिले सरकारी रुग्णालय

रोबोटिक सहाय्याने शस्त्रक्रिया करणारे GMC देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.
GMC Orthopaedics successfully conducted first robotic surgery
GMC Orthopaedics successfully conducted first robotic surgeryDainik Gomantak

GMC Orthopaedics successfully conducted first robotic surgery: GMC मधील ऑर्थोपेडिक्स विभागात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. या शस्त्रक्रियेमुळे ऑर्थोपेडिक आणि स्पाइनल प्रक्रियेत क्रांती घडवून आली आहे. असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले आहेत.

रोबोटिक सहाय्याने शस्त्रक्रिया करणारे GMC देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.

गुडघ्याचा संधिवात असलेल्या मडगाव येथील 67 वर्षीय रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय कुशलतेने ही शस्त्रक्रिया पार पाडली.

अचूकतेसाठी जागतिक स्तरावर ही रोबोटिक शस्त्रक्रिया प्रसिद्ध आहे. 45 मिनिटांच्या आत शस्त्रक्रिया पूर्ण झाली. शस्त्रक्रियेत कमीत कमी कट, कमी रक्तस्त्राव आणि न होणारे पोस्टऑपरेटिव्ह ड्रेनेज यातून शस्त्रक्रियेची अचूकता सिद्ध होते. असे गोमेकॉतील डॉक्टरांनी म्हटले आहे.

GMC Orthopaedics successfully conducted first robotic surgery
दिल्लीत गफला गोव्यात उद्योग! वेब सिरीज बघून पोलिसांनी केली फसवेबहाद्दर पती पत्नीला अटक

शस्त्रक्रिया करणाऱ्या या टीमचे नेतृत्व एचओडी डॉ.शिवानंद बांदेकर यांनी केले.

गोव्यातील आरोग्य सेवांच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. GMC मध्ये पार पडलेली यशस्वी शस्त्रक्रिया सर्जिकल क्षेत्रातील एक महत्त्वाची वाटचाल दर्शवते. ही वाटचाल अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचे प्रतीक आहेत. असे राणे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com