Goa Engineering College: गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 'क्रिएथॉन'चे आयोजन

कार्यक्रमाद्वारे ई-बीट बुक सिस्टम तयार करणे हा उद्देश आहे.
Goa Engineering College
Goa Engineering CollegeDainik Gomantak

गोवा पोलीस आणि गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी "क्रिएथॉन" कार्यक्रम करण्यात आला. क्रिएटाथॉन कार्यक्रमाद्वारे ई-बीट बुक सिस्टम तयार करणे हा उद्देश आहे. बीट बुक हे विशिष्ट बीट क्षेत्रातील समाजविरोधी घटकांसह सर्व तपशीलांच्या माहितीचे संकलन आहे.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागातील विद्यार्थ्यांना निधीन वलसन (एसपी) प्राचार्य जीईसी डॉ. एम. एस. कृपाशंकर, विभागप्रमुख डॉ. नीलेश बी यांनी माहिती दिली.

तसेच यावेळी फळदेसाई, डॉ. आयशा फर्नांडिस असोसिएट प्रोफेसर आयटी विभाग, श्री बिपीन नाईक, सहाय्यक प्राध्यापक आयटी विभाग आणि पीआय सरोज दिवकर, पीआय टीपीयू उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Goa Engineering College
Goa Engineering CollegeDainik Gomantak
Goa Engineering College
National Games: मॉडर्न पेंटॅथलॉनसाठी फोंड्याला पसंती, नव्वद टक्के सुविधा उपलब्ध

यावेळी विद्यार्थ्यांच्या 13 संघांनी नोंदणी केली असून त्यांना ई-बीट बुक अॅप तयार करण्यासाठी वीस दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट तीन अॅप्सना बक्षीस दिले जाईल आणि सिक्युरिटी ऑडिटनंतर सर्वोत्कृष्ट ई बीट बुक अॅपचा वापर गोवा पोलिस त्यांच्या "SMART" पोलिसिंग इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून समाविष्ट करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com