Karate Championship: उत्तर गोवा जिल्हा कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन

१२०० विद्यार्थ्यांनी विविध श्रेणींमध्ये सहभाग घेतला
Karate Championship
Karate ChampionshipDainik Gomantak
Published on
Updated on

Karate Championship: पारंपरिक कराटे असोसिएशन ऑफ गोवातर्फे (टीकेएजी) रविवारी पेडे स्पोटर्स कॉम्प्लेक्स येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये उत्तर गोवा जिल्हा कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यात सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी विविध श्रेणींमध्ये सहभाग घेतला होता.

Karate Championship
Goa News 08 January 2024: मार्केटमधल्या वादाचे रूपांतर मारहाणीत; संशयिताच्या मुसक्या आवळल्या

या स्पर्धेचे उद्घाटन म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, नगरसेवक विकास आरोलकर, नगरसेवक सुशांत हरमलकर, जोसेफ रॉड्रिग्स, सुभाष कळंगुटकर व इतर असोसिएशनचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. ही स्पर्धा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सहा वर्षापासून ते २१ वर्षाखालील युवकांचा समावेश होता. याशिवाय दिग्गजांसाठी आणखी एक श्रेणी होती.

टीकेएजीचे अध्यक्ष जोसेफ रॉड्रिग्ज म्हणाले की, कराटे हे सुमारे ४०० वर्षांच्या जुन्या प्रकारांपैकी एक आहे. आज जगभरात लाखो लोक सराव करत आहेत. इतर मार्शल प्रकारांच्या तुलनेत कराटेची जगभरात मानकीकरण प्रणाली आहे म्हणून गेल्या ऑलिम्पिककमध्ये कराटे सादर करण्यात आले.

टीकेएजीचे सरचिटणीस सुभाष कळंगुटकर म्हणाले की, असोसिएशनसाठी हे आव्हानात्मक कार्य आहे. कारण आमच्याकडे प्रत्येक श्रेणींमध्ये जवळफास ८० सहभागी आहेत आणि प्रत्येक सहभागीला एक्सपोजर मिळेल याची खात्री केली जाते.

कराटेला प्रोत्साहन देण्यासाठी गोव्याच्या पारंपरिक कराटे असोसिएशनच्या प्रयत्नांचे कौतुक प्रिया मिशाळ या उद्घाटनावेळी संबोधित करताना केले. या स्पर्धेत १२०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत आणि विजेते हे दक्षिण गोव्यातील विजेत्यांसाठी लढतील आणि नंतर ते अंतिम फेरीत भाग घेऊन नंतर राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com