Souza Lobo Restaurant Case: 26 जणांविरुद्ध आरोप निश्चिततेचा आदेश

पूर्वनियोजित कटकारस्थान : रेस्टॉरंटमध्ये बळजबरीने केला होता हल्ला
Goa Government | Souza Lobo Restaurant
Goa Government | Souza Lobo RestaurantDainik Gomantak

Souza Lobo Restaurant Case: कळंगुटमधील सोझा लोबो रेस्टॉरंटमध्ये 28 डिसेंबर 2021 रोजी, व्यावसायिक शत्रुत्वावरुन झालेल्या हल्ला प्रकरणी म्हापसा न्यायालयाने प्रथमदर्शनी संशयिताविरूद्ध पुरावे असल्याने आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.

याप्रकरणी संशयितांविरुद्ध 141, 143, 144, 147, 148, 427, ३२६, 307, 120 (ब) व 149 अन्वये गुन्हा नोंद आहे.

Goa Government | Souza Lobo Restaurant
Dr. Pramod Sawant : 2050 पर्यंत 100 टक्के अक्षय ऊर्जेचे लक्ष्य : मुख्यमंत्री

प्राप्त माहितीनुसार, मास्टरमाईंड राहुल राठोड व राजेंद्रसिंग ऊर्फ छोटू यांचाही समावेश आहे. व्यवसायावरुन वाद होऊन व्यावसायिक राजीव अरोरा याने सुनील भोमकार याला सांगून दहा ते पंधरा जणांना सोबत घेऊन सोझा लोबो रेस्टॉरंटवर हल्ला करायला लावला होता.

घटनेच्या दिवशी संशयितांनी रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीरपणे बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. याशिवाय तेथील कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात रेस्टॉरंटमधील काही स्टाफला गंभीर दुखापत झालेली.

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा अचानकपणे दोन गटात तंटा झाला नव्हता, तर हे प्रकरण पूर्वनियोजित कटकारस्थान होते, असे कोर्टाने निदर्शनावेळी म्हटले आहे.

राहुल राठोड, सुनील राठोड, गजेंद्र सिंग उर्फ छोटू, सीताराम शिरोडकर, अविनाश सिंग, विजय प्रकाश, संतोष चंद्रहास, सोहेल राणा हुसैन, हेमंतकुमार जोशी उर्फ गिल, पुष्पेंद्र मिना, सुनील भोमकार, मोहम्मद सादीक उर्फ लिंबू, सूरज कुमार, रोहित अविनाश मिंज, पंकज सिंग, अर्जुन आचार्य, मल्लिंगराया पुजारी, किशोर साळवी, सत्यवान कोरगांवकर, लवलेश पांडे, अन्वेश फडते, छोटू पळ उर्फ ब्रावो कालिया, अनिल हरिकांता, अकबर, धीरज व राजीव अरोरा हे आरोपी आहेत.

Goa Government | Souza Lobo Restaurant
Michael Lobo : बोटधारकांचा ‘जीईएल'शी करारास नकार; मुख्यमंत्र्यांकडे विषय

छोटू, राठोडला जामीन

कळंगुट येथील सौझा लोबो रेस्टॉरंट तोडफोडप्रकरणी गेल्यावर्षी अटक झालेल्या संशयित छोटू पाल व संशयित राहुल राठोड या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. हे दोघेही संशयित गेले वर्षभर कारागृहात आहेत.

त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना खटल्यावरील सुनावणीवेळी उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या दोघाही संशयितांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची वैयक्तिक हमी तसेच तत्सम रक्कमेचा एक हमीदार सादर करावा. 1 व 15 तारखेला पोलिसात हजेरी लावावी, असा आदेश आहे.

30-40 जणांचा हल्ला

या रेस्टॉरंटच्या तोडफोडप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार गजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली 30-40 जणांचा गट हातात चाकू, दंडुके, हॉकी स्टीक, लोखंडी सळई तसेच चॉपर घेऊन चाल करून आले होते.

त्यामध्ये सुनील, राहुल राठोड, सीताराम, संतोष, सोहेल, विजय, हेमंत ऊर्फ लोकेश पांडे, किशोर, लिंबू, ब्रावो ऊर्फ कालिया (छोटू पाल), पुष्पेंदर, मालू, सुनील भोमकर व इतरांचा समावेश होता. या झालेल्या तोडफोडवेळी रेस्टॉरंटचा व्यवस्थापक अनुप त्रिपाठी व कर्मचारी विकास पवार हे गंभीर जखमी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com