Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

Verna Garbage Project opposition : राज्य सरकारने हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Verna Garbage Project opposition
Verna Garbage Project oppositionDainik Gomantak

सासष्टी, वेर्णा औद्योगीक वसाहत येथील प्रस्तावित कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी नुवे, लोटली, वेर्णा व नागोवा येथील नागरिक या प्रकल्पाच्या जागेत एकवटले.

राज्य सरकारने हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हा प्रकल्प लोकवस्तीपासून केवळ ३५० मीटर दूर असून त्याचा त्रास या लोकांना जाणवेल. शिवाय या प्रकल्पामुळे परिसरातील जलस्रोतांना बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने काही शिफारसी केल्याचे स्थानिक एवर्सन वालेस यांनी सांगितले.

समितीच्या शिफारसीप्रमाणे सरकारने लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात, असे सुचविले आहे. याच परिसरात एम्ब्युलर तळी आहे व इथूनच साळ नदीचा उगम होत आहे, असे वालेस यांनी सांगितले.

Verna Garbage Project opposition
B 32 Muthal 44 vare : ब्रा साईज पाहणाऱ्यांच्या कानाखाली वाजवणारा विद्रोही मल्याळम चित्रपट माहितेय का?...

अंतराबाबत चुकीची माहिती

फार्मा कंपनी व श्री महालसा मंदिरापासून हा प्रकल्प किती अंतरावर आहे, हे जे प्रकल्पाचे समर्थक सांगतात ती चुकीची माहिती असल्याचे समाज कार्यकर्त्या झरीन दा कॉस्ता यांचे म्हणणे आहे.

समर्थक सांगतात की, हे मंदिर १०.७ किलोमीटरवर आहे; पण प्रत्यक्षात हे अंतर केवळ २.२ किलोमीटर आहे. प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेपासून केवळ २३९ मीटर अंतरावर चॅपल आहे, असे दा कॉस्ता यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com