Wing Commander Maria Pereira: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गोव्याच्या लेकीने घडवला इतिहास! विंग कमांडर मारिया परेरा यांना युद्धकालीन शौर्य पुरस्कार

Operation Sindoor Wartime Gallantry Award: बेताळभाटी येथील विंग कमांडर मारिया परेरा 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये बजावलेल्या भूमिकेबद्दल युद्धकालीन शौर्य पुरस्काराने सन्मानित
air force wartime awards
air force wartime awardsDainik Gomantak
Published on
Updated on

Wing Commander Maria Pereira Award: बेताळभाटी येथील विंग कमांडर मारिया इस्मिनिया सांचा परेरा यांनी 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना 'मेन्शन-इन-डेस्पॅच' (Mention-in-Despatch) या युद्धकालीन शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी अत्यंत निर्णायक ठरली, ज्यामुळे भारतीय हवाई दलाच्या (IAF) मोहिमांना मोठे यश मिळाले. या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या त्या पहिल्या गोमंतकीय महिला ठरल्या आहेत.

'ऑपरेशन सिंदूर'मधील अतुलनीय कामगिरी

'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान विंग कमांडर मारिया परेरा यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून आपल्या कर्तव्यापलिकडे जाऊन काम केले. त्यांच्या अचूक आणि वेळेवर दिलेल्या गुप्त माहितीमुळे भारतीय हवाई दलाला शत्रूंवर योग्य वेळी हवाई हल्ले करणे शक्य झाले. तसेच, त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना मिळाली, ज्यामुळे मोठ्या नुकसानीला टाळता आले. त्यांची ही कामगिरी भारतीय हवाई दलासाठी महत्वाची ठरली.

air force wartime awards
Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

गोव्यासाठी अभिमानाचा क्षण

युद्धकाळात शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या या पुरस्काराने मारिया परेरा यांनी गोव्याचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे. कोणत्याही युद्धकालीन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या त्या पहिल्या गोमंतकीय महिला आहेत. त्यांच्या या कामगिरीने गोव्याच्या महिलांसाठी आणि एकूणच तरुणाईसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या या शौर्यामुळे संपूर्ण गोवा राज्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

पाकिस्तानची 5 फायटर प्लेन पाडली

भारताने ७ मे रोजी सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानच्या ५ फायटर जेट्सना उध्वस्त केले असल्याची अधिकृत घोषणा शनिवारी एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केली. बंगलोरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाच फायटर जेट्सना S-400 एअर डिफेन्स सिस्टम्स च्या साहाय्याने नष्ट करण्यात आले. याशिवाय, एक मोठा एअरबॉर्न वॉर्निंग आणि कंट्रोल (AEW&C) किंवा अर्ली वॉर्निंग विमान देखील नष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com