मीठ आयात करण्याच्या बहाण्याने अमली पदार्थांचा खुलेआम व्यवहार

50 कोटी रुपयांचे 34.7 किलो हेरॉईन जप्त
Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Crime: महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या गोवा आणि दिल्ली शाखांनी नवी दिल्लीत सुमारे 50 कोटी रुपयांचे 34.7 किलो हेरॉईन जप्त केल्यानंतर मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. हे अमली पदार्थ इराणमधून भारतात मीठ आयात म्हणून लपवले गेले होते.

याप्रकरणी उत्तर गोव्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल जहीर नासीर (39) मूळचा अफगाणिस्तानचा रहिवासी असलेला पण दिल्लीत राहणारा नितीश सुमन प्रसाद कुमार (30) लाजपत नगर, दिल्ली या दोन संशयितांना डीआरआयच्या गोवा शाखेने छापा टाकून अटक केली. उत्तर गोव्यातील (North Goa) एक प्रतिष्ठित नाईट क्लब ड्रग्सचा व्यवहार चालू असताना.

Crime News
डिचोलीत गवा रेड्यांचा वावर; गावकरी चिंतेत

संशयितांनी आठ दिवसांपूर्वी मीठ आयातीच्या बहाण्याने इराणमधून अमली पदार्थांचा कंटेनर आणला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुमार यांच्या कंपनीने कथितरित्या मीठाचे सहा कंटेनर मागवले होते आणि भारतात आल्यानंतर हे कंटेनर तुघलकाबाद, नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय कंटेनर डेपोमध्ये उतरवण्यात आले होते.

17 फेब्रुवारी रोजी डीआरआयच्या दिल्ली विभागाने कंटेनरची झडती घेतली असता असे दिसून आले की इतर पाच कंटेनरमध्ये मीठ होते, तर एका कंटेनरमध्ये 34.7 किलो हेरॉईन लपविण्यात आले होते. हेरॉईनचा हा कंटेनर नंतर डीआरआयने जप्त केला.

तपासादरम्यान, कंपनीचा मालक आणि आणखी एक संशयित अमली पदार्थांशी संबंधित व्यवहारासाठी गोव्यात गेल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत डीआरआयच्या दिल्ली विभागाने डीआरआयच्या गोवा शाखेतील आपल्या समकक्षांना सतर्क केले. त्यानंतर डीआरआयच्या गोवा शाखेने कारवाई केली आणि तपासात समोर आले की संशयित उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातील एका नामांकित नाईट क्लबमध्ये (Nightclub) अमली पदार्थाच्या व्यवहारासाठी गेला होता.

त्यानंतर डीआरआयच्या गुप्तहेरांनी सापळा रचला आणि नाईट क्लबवर छापा टाकून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यांनी अब्दुल जहीर नासीर आणि नितीश सुमन प्रसाद कुमार यांना गुरुवारी रात्री अटक केली.

संशयितांना नंतर पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयात (District and Sessions Court) हजर करण्यात आले, जेथे न्यायाधीश शबनम शेख यांनी दोन्ही संशयितांना तीन दिवसांची कोठडी सुनावली. डीआरआयच्या गोवा शाखेचे एक पथक शनिवारी रात्री दोन संशयितांसह नवी दिल्लीला रवाना झाले, कारण या संपूर्ण घटनेचा डीआरआय दिल्ली आणि गोवा विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com