Now at Mother Dairy's Safal Kendra, you can get one kg onion for Rs 25.
Now at Mother Dairy's Safal Kendra, you can get one kg onion for Rs 25.Dainik Gomantak

Onion Prices: खूशखबर! गोव्यात कांद्याचे दर दहा रुपयांनी उतरले...

दिवाळीच्या तोंडावर या किमती अजून कमी होण्याचे संकेत
Published on

Onion Prices: परतीच्या पावसामुळे कांद्याची आवक घटली होती. खराब होण्याच्या भीतीमुळे कांदा विक्रीस काढला नसल्यामुळे बाजारात कांद्याचा पुरवठा कमी झाला. यामुळे कांद्याच्या किमतीवर झटकन परिणाम होऊन किमती वाढल्या.

मात्र दिवाळीच्या तोंडावर या किमती कमी होण्याचे संकेत दिसत आहेत.

Now at Mother Dairy's Safal Kendra, you can get one kg onion for Rs 25.
वजन व माप खात्‍याच्‍या धाडीत मडगावातून तीन लाखांची मसाल्‍याची उत्‍पादने जप्‍त

ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या वाढलेल्या किमतींनी सामान्यांच्या डोळ्यांतून पाणी काढले. कांद्याच्या किमती 60 ते 80 रुपयांवर पोहोचल्या होत्या. या किमती 100 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र केंद्रसरकारने निर्यात शुल्क वाढवल्याने किमती कमी होण्यास मदत झाली. तसेच गोव्यात बेळगावमधून कांद्याची आवक वाढल्याने राज्यातील कांद्याच्या किमती 10 रुपयांनी घसरल्या आहेत.

आधी कांद्याची किंमत 60 ते 80 रुपये होती. तीच किंमत आता 50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान ही किंमत अजून घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com