Onion Price Hike Goa: गोव्यात 'कांदा' शंभरी पार! गोमंतकीयांच्या डोळ्यातून काढलं पाणी; आवक घटली

Onion Market Crisis Goa: दैनंदिन आहारातील घटक असलेला कांदा स्वस्त होण्याची चिन्हे सोडाच, आता कांद्यामुळे सामान्य गृहिणींच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत.
Onion Price Hike Goa: गोव्यात 'कांदा' शंभरी पार! गोमंतकीयांच्या डोळ्यातून काढलं पाणी; आवक घटली
Onion Price Hike GoaDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: दैनंदिन आहारातील घटक असलेला कांदा स्वस्त होण्याची चिन्हे सोडाच, आता कांद्यामुळे सामान्य गृहिणींच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत. दरवाढीच्या दिशेने वाटचाल करीत असलेला कांदा आता आणखी ‘तिखट’ झाला आहे. कालपर्यंत ८० रुपये किलो असलेल्या कांद्याचे दर आता शंभरीवर पोचले आहेत.

बुधवारी डिचोलीच्या आठवडी बाजारात साधारण कांद्याचे दर ८० रुपये तर उत्कृष्ट दर्जाचे कांदे १०० रुपये किलो या दराने विकण्यात येत होते. कांद्याच्या तुटवड्यामुळे कांद्याचे दर वाढले असून, कांदा आणखीनही महाग होण्याचे संकेत विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६० रुपये किलो. असे कांद्याचे दर होते. मात्र पहिल्या आठवड्यानंतर कांद्याच्या दरात किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली होती. कालपर्यंत हे दर स्थिर होते. मात्र आज आठवडी बाजाराच्या दिवशीच कांदा महाग झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

डिचोलीच्या (Bicholim) बाजारात अधिकाधिक भाजी ही कर्नाटक राज्यातून येत असते. लसूण वगळता अन्य भाज्यांचे दर नियंत्रणात आहेत. मात्र कांदा पुन्हा दरवाढीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दोन महिन्यापूर्वी ऐन चतुर्थीच्या तोंडावर कांदा महाग म्हणजेच ८० रुपये किलो झाला होता. मात्र चतुर्थीनंतर नवीन कांदा बाजारात आल्यानंतर कांदा जवळपास २० रुपयांनी स्वस्त झाला होता. दिवाळीत कांद्याचे दर स्थिर होते. मात्र नंतर कांदा पुन्हा ८० रुपये किलोवर पोचला.

आवक घटली...

यंदा कर्नाटकात (Karnataka) पावसाने कहर केला आहे. पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याची आवक घटली आहे. तसे संकेतही बाजारातील काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. सध्या अन्य भाज्यांचे दर स्थिर असले, तरी भाज्यांचा तुटवडा निर्माण होऊन भाज्या महागण्याची शक्यता आहे. तसे संकेतही रमेश रेड्डी आणि अन्य विक्रेत्यांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com