कुडचडे : सावर्डे (Sanverdam) मतदारसंघात पुराचा (Floods) बळी गेल्याची दुःखद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात शोक पसरला आहे. मल्लारीमळ कोडली, किर्लपाल-दाभाळ येथील महादेव मोमू गावकर (वय 46) यांचा 23 जुलै रोजी पुरात बुडून मृत्यू झाल्याची माहिती कुडचडे पोलिस (Kudchade Police) ठाण्यातून प्राप्त झाली. (One person died in floods in Sanverdam Goa)
महादेव हे सकाळी बाहेर पडले होते. ते घरी परत न आल्यामुळे शोधाशोध सुरू झाली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने त्यांच्याबाबत माहिती मिळाली नव्हती. 27 रोजी सकाळी 6. 30 वाजता त्यांचा मृतदेह झाडात अडकलेला दिसून आला. तो कुजलेला होता. घटनेचा पंचनामा पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश नाईक यांनी केला. शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला.
सकाळपासून बाहेर
महादेव गावकर हे सकाळी बाहेर पडले होते. ते घरी परत न आल्यामुळे शोधाशोध सुरू झाली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने त्यांच्याबाबत माहिती मिळाली नव्हती.
दरम्यान राज्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. वरुणराजाची कृपा झाल्याने सध्या राज्यातील पूर ओसरला खरा, मात्र आता पूरग्रस्तांसमोर नानाविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. घरादारांतील चिखल साफ करता, करता पूरग्रस्तांसमोर आता सापांचे आणि मगरीचेही संकट निर्माण झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या साप-जिवाणूनी काही घरांचा आसरा घेतला आहे. चिखल आणि घाणीमुळे रोगराई फैलावण्याची भिती वाढली आहे. दरम्यान, पूर ओसरला असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.