Delhi liquor Scam: दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. ईडीने रथ जाहिरात कंपनीशी संबंधित राजेश जोशी यांना गोवा निवडणुकीदरम्यान (Goa Election) मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.
गोवा निवडणुकीसाठी राजेश यांनी 'रथ अॅड' या जाहिरात कंपनीच्या माध्यमातून 30 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपी दिनेश अरोरा याने राजेश जोशी याला पाठिंबा दिला होता. दिनेश अरोरा हा 'आप'चे विजय नायर यांच्यासोबत काम करत होता. अशी माहिती समोर आली आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी दिनेश अरोरा यांच्यासह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे सर्वजण सिसोदिया यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे.
'आप'ने दिल्लीतील दारू घोटाळ्याचा पैसा गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरला होता. असा दावा ईडीने केल्याने खळबळ निर्माण झाली होती.
'दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपी विजय नायर याने इंडोस्पिरिट्सचे एमडी समीर महेंद्रू यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी बोलायला लावले होते. विजयच्या फोनवरून फेसटाइम व्हिडिओ कॉलद्वारे हे संभाषण झाले.' असा आरोप दारू घोटाळ्यात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ईडीने केला आहे.
यापूर्वी 08 फेब्रुवारी रोजी ईडीने पंजाबच्या अकाली दलाचे माजी आमदार आणि मद्यविक्रेता दीप मल्होत्रा यांचा मुलगा गौतम मल्होत्रा याला अटक केली होती. गौतम अबकारी धोरणांतर्गत उत्पादन करत असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला. याशिवाय ते घाऊक व्यापारी आणि वितरकही होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, 22 सप्टेंबर, 26 ऑक्टोबर आणि 13 डिसेंबर रोजी गौतमची अमित अरोरासोबत समोरासमोर चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, दिल्लीचे सीएम केजरीवाल यांनी ईडीचे आरोप पूर्णपणे काल्पनिक असल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.