37th National Sports Championship: श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमला नव्याने झळाळी

अंदाजे खर्च 9.27 कोटी रुपये ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त नूतनीकरण

Shyama Prasad Mukherjee Stadium
Shyama Prasad Mukherjee StadiumDainik Gomantak

Shyama Prasad Mukherjee Stadium गोव्याच्या यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचा कायापालट केला जाणार असून त्यासाठी अंदाजे 9.27 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम नूतनीकरणासाठी गोवा क्रीडा प्राधिकरणाने 9,27,61,110 रुपयांची निविदा काढली आहे. याअंतर्गत स्टेडियम नूतनीकरण, देखभाल आदी कामे होणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात हे स्टेडियम एक मुख्य केंद्र असेल.


Shyama Prasad Mukherjee Stadium
Goa Police: कौतुकास्पद! गोवा पोलिसांनी शस्त्रक्रियेसाठी वेळेत पोहचवले यकृत; गोमॅको ते दाबोळी ग्रीन कॉरिडॉर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, तलवारबाजी आदी खेळ होण्याचे नियोजन आहे.

अजून त्याविषयी अधिकृत घोषणा झालेली नाही. 2014 साली गोव्यात झालेल्या लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेतील बास्केटबॉल व व्हॉलिबॉल हे खेळ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाले होते.


Shyama Prasad Mukherjee Stadium
Noise Pollution In Goa: ध्वनिप्रदूषणाविरुद्ध चार्जशीट दाखल, हणजूण- वागातोर भागातील घटना

स्टेडियमचे उदघाटन नऊ वर्षांपूर्वी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचे उदघाटन 2014 साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेनिमित्त झाले होते.

11 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हे स्टेडियम उभे राहिले होते. बांधकामासाठी अंदाजे 82कोटी रुपये खर्च आला होता. सर्वांत लांब एकेरी पृष्ठभाग आच्छादन वापरण्यात आलेले हे आशियातील तेव्हा पहिले स्टेडियम ठरले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com