Omkar Elephant: ओंकार हत्ती पुन्हा गोव्यात, बंदोबस्त करणार कोण? गोवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा प्रस्ताव नेतर्डेवासीयांनी धुडकावला

Omkar Elephant In Goa: ‘ओंकार’ हत्तीला पकडून कर्नाटकात पाठवण्यासाठी कर्नाटक सरकारची मदत घेतली जाईल, असे गोव्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी यापूर्वी म्हटले होते.
Omkar Elephant
Omkar ElephantDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोव्यात शेतीचे नुकसान करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला पकडून कर्नाटकात पाठवण्यासाठी कर्नाटक सरकारची मदत घेतली जाईल, असे गोव्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी यापूर्वी म्हटले होते. हा हत्ती महाराष्ट्रात गेल्यानंतर पुन्हा त्याने आज गोव्याच्या मोपा भागात प्रवेश केला असून  स्थानिक लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ओंकार हत्तीचा बंदोबस्त कोण करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Omkar Elephant
Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

सविस्तर माहितीनुसार, ओंकार हत्तीने शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता सिंधुदुर्गमधील नेतर्डे गावातून कडशी -मोपा येथे प्रवेश केला. ओंकार हा नेतर्डे येथे असल्याची माहिती पेडणे वनविभागाला मिळाल्याने अगोदरच पेडणे वन विभागाचे अधिकारी हरीश महाले यांनी ओंकारला पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने परतवण्याचा प्रयत्न केला.  मात्र, नेतर्डेतील लोक लाठ्या-काठ्या घेऊन जमले होते.

सिंधुदुर्ग वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ओंकारला गोव्यात पिटाळल्यामुळे पेडण्याचे वन  अधिकारी त्याला परत महाराष्ट्राच्या हद्दीत पाठवण्यासाठी गेले. महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केल्यावर  तेथे जमावाने महाराष्ट्राच्या हद्दीत तुम्ही आलातच कसे, अशी हरकत घेतली. ‘आम्ही मिळून या हत्तीला वरच्या जंगलात पिटाळू’, हा प्रस्तावही त्यांनी धुडकावला.

Omkar Elephant
Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

वातावरण काही काळ तंग

नेतर्डेवासी पेडण्याच्या अधिकाऱ्यांचा प्रस्ताव ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ‘तुम्ही या हत्तीचे पाहिजे ते करा. कुठल्याही परिस्थितीत आम्ही या हत्तीला आमच्या हद्दीत घेणार नाही’ असे पेडणे वन  खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितले.’ अशाप्रकारे एका बाजूने  पेडणे वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी तर दुसऱ्या बाजूने नेतर्डे  येथील ग्रामस्थ यांच्यात बराच वेळ शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तंग झाले होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com